मुंबई - Dunki box office day 5: शाहरुख खानचा नवीन रिलीज झालेला 'डंकी' हा चित्रपट वीकेंडमध्ये १०० कोटींहून अधिक कमाई करणारा सलग तिसरा चित्रपट आहे. ख्रिसमसच्या सुट्टीमुळे सोमवारी कॉमेडी-ड्रामा चांगलाच गर्दी खेचत आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान आणि तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत आहेत.
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, 'डंकी'ने सोमवारपर्यंत भारतात 125 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. डंकीने पहिल्या दिवशी 29.2 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 30.7 कोटी रुपयांची कमाई केली. पाचव्या दिवशी, 'डंकी'ने डोमेस्टिक सर्किटमध्ये 22.50 कोटी रुपयांची कमाई केली आणि एकूण 128.13 कोटी रुपयांचा कमाईचा आकडा गाठला आहे.
राजकुमार हिराणी यांच्या 'डंकी'मध्ये मैत्री, देशाच्या सीमा, घरासाठीचा नॉस्टॅल्जिया आणि प्रेमाची कथा आहे. हिराणी यांनी कनिका ढिल्लन आणि अभिजात जोशी यांच्यासोबत स्क्रिप्टवर काम केले आहे. शाहरुख आणि तापसी पन्नू यांच्या शिवाय या चित्रपटात विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हरयांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट पीके फेम दिग्दर्शक राजकुमार हिराणीसोबत एसआरकेचा पहिलाच एत्रीत चित्रपट आहे. 'डंकी' हा बेकायदेशीर इमिग्रेशन युक्तीचा चित्रपट आहे ज्याला "डंकी प्लाईट" म्हणूनही ओळखले जाते.
'ठाण' आणि 'जवान' या बॅक-टू-बॅक चित्रपटाच्या यशानंतर 2023 मधील शाहरुखचा हा तिसरा आणि शेवटचा रिलीज आहे. मनू, सुखी, बुग्गू आणि बल्ली या चार मित्रांबद्दलची ही एक अद्भुत कथा आहे. त्यांना लंडनमध्ये चांगल्या आयुष्यासाठी स्थायिक व्हायचे आहे परंतु त्यासाठी त्यांना कठीण पण जीवन बदलून टाकणाऱ्या प्रवासाला सुरुवात करावी लागेते. जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिराणी फिल्म्स निर्मित 'डंकी' चित्रपट प्रभासची भूमिका असलेल्या 'सालार' चित्रपट थिएटरमध्ये येण्याच्या एक दिवस आधी, २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपटांची सध्या बॉक्स ऑफिसवर स्पर्धा सुरू आहे.
हेही वाचा -
- अरबाज खानने शुरा खानसोबत लग्न केल्यानंतर मलायका अरोराने शेअर केली पहिली पोस्ट
- 'मैं अटल हूं' चित्रपटातील देशभक्तीपर "देश पेहले" हे गाणं लॉन्च
- अरबाज खानच्या लग्नात सलमान खानचा नवविवाहित वधू आणि अरहान खानसोबत डान्स