मुंबई - Dunki box office day 4: शाहरुख खान अभिनीत डंकी आणि प्रभास स्टारर सालार या दोन मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर गेल्या आठवड्यात झाली. प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार'ने वादळ निर्माण केले असले तरी राजकुमार हिराणीचा 'डंकी' सुरुवातीच्या वीकेंडमध्ये शर्यतीत टिकून राहण्यात यशस्वी झाला आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्या तीन दिवसांच्या कमाईच्या तुलनेत रविवारी लक्षणीय वाढ झाली.
'डंकी' हा शाहरुख खान आणि राजकुमार हिराणी यांचा पहिलाच एक्तरीत चित्रपट आहे. पहिल्या विकेंडला चित्रपटानं चांगली अंक प्राप्त केले. हा चित्रपट गुरुवारी 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि सुरुवातीच्या दिवसात काहीसा कमी पडला वाटत होते. मात्र चित्रपटाला मिळालेली सकारात्मक माऊथ पब्लिसिटीमुळे प्रेक्षक पुन्हा थिएटरकडे वळले आणि बॉक्स ऑफिसवर कमाईचे आकडे सुधारले. 'डंकी'ने भारतात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि पहिल्या आठवड्याच्या शेवटी जगभरात 200 कोटींची कमाई झाली आहे.
सॅकनिल्कने प्रकाशित केलेल्या ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रविवारी 32 कोटी रुपयांची कमाई करून चौथा दिवस गाजवला. यामुळे पहिल्या चार दिवसांत त्याचा देशांतर्गत गल्ला 107 कोटी झाला आहे. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी केली आहे. युरोप, उत्तर अमेरिका आणि मध्य पूर्वेतील शाहरुखच्या स्टार पॉवरमुळे चित्रपट हाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.