मुंबई - Dunki Movie : अभिनेता शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटचा ट्रेलर हा 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता रिलीज करण्यात आला होता. हा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडल्याचं दिसतंय. दरम्यान 24 तासांत यूट्यूबवर सर्वाधिक हा ट्रेलर पाहिला गेला आहे. या ट्रेलरनं एक विक्रम केला आहे. शाहरुख खानच्या चाहत्यासाठी हे वर्ष खास आहे. किंग खानचे लागोपाठ दोन चित्रपट हिट ठरले. आता शाहरुखचा 'डंकी' चित्रपट रुपेरी पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुख खाननं हे वर्ष हिंदी सिनेप्रेमींसाठी खास बनवले आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी', या वर्षी ख्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे.
'डंकी'च्या ट्रेलरनं केला नवा विक्रम :या चित्रपटाचा हा ट्रेलर नवीन रेकॉर्ड बनवत आहे. या ट्रेलरला 6 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत, यूट्यूबवर 62 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या कामगिरीनं 'डंकी'नं 'सालार: सीझफायर'च्या हिंदी ट्रेलरला मागे टाकले आहे. बॉक्स ऑफिसवर 'डंकी'सोबत टक्कर देणारा प्रभास स्टारर चित्रपटाला यूट्यूबवर 24 तासांत 53.75 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. 24 तासात यूट्यूबवर सर्वाधिक व्ह्यूज असलेला 'आदिपुरुष' हा टॉप तिसरा हिंदी ट्रेलर आहे. सर्वाधिक पाहिले गेलेले हिंदी ट्रेलर 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे आहेत, ज्यात दोन प्रभास आणि दोन रणबीर कपूर अभिनीत सिनेमा आहेत.