मुंबई - Dunki Advance booking : अभिनेता शाहरुख खान स्टारर 'डंकी' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये किंग खान व्यतिरिक्त तापसी पन्नू, विकी कौशल, सतीश शाह, बोमन इराणी आणि इतर कलाकार दिसणार आहेत. 'डंकी' हा शाहरुख खानचा या वर्षातील शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. 'डंकी' रुपेरी पडद्यावर 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला आता साऊथचा सुपरस्टार प्रभास स्टारर 'सालार पार्ट 1 ' टक्कर देताना दिसेल. दरम्यान या दोन्ही चित्रपटांची आगाऊ बुकिंग सुरू झाली आहे.
'डंकी' चित्रपटाचे आगाऊ बुकिंग :'डंकी' या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचे आकडे खूप धक्कादायक आहेत. 16 डिसेंबरपासून देशांतर्गत 'डंकी'चं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. किंग खाननं 2023 वर्षात 'पठाण' आणि 'जवान' चित्रपट सुपर हिट दिले आहेत. 'सॅकनिल'च्या रिपोर्टनुसार 'डंकी'च्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये पहिल्या दिवशी आतापर्यंत फक्त 14 तिकिटे विकली गेली आहेत, त्यामुळं या चित्रपटानं 2320 रुपयांची कमाई केली असल्याचं समजत आहे. आगाऊ बुकिंगचे आकडे अगदी प्राथमिक स्वरूपाचे आहे. दुपारी 2 पर्यत 'डंकी'ची 14 तिकिटे विकली गेल्यानं, या चित्रपटाची कमाई येणाऱ्या काळात किती होईल हे पाहण लक्षणीय ठरणार आहे. दुसरीकडे ४ वाजेपर्यंत या चित्रपटानं आणखी फक्त 9 तिकिटे विक्री केली आहे. यासह या चित्रपटाची दुपारी सव्वाचार पर्यंत 23 तिकिटे विक्री झाली आहेत. 'डंकी' हा चित्रपट 'पठाण' आणि 'जवान' प्रमाणेचं कमाई करेल अशी सध्या अपेक्षा केली जात आहे. तर दुसरीकडे 'सालार'नं तेलुगूत 17022 , मल्याळम 4680 आणि तामिळमध्ये 415 तिकिटे विक्री केली आहे. यासह या चित्रपटाची देशांतर्गत एकूण तिकिट 22117 विकली गेली आहे. या चित्रपटानं आतापर्यत रिलीजपूर्वी एकूण 49.35 लाखाची कमाई केली आहे.