महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Taapsee pannu shared pictures : तापसी पन्नूनं बॉयफ्रेंड मॅथियास बोएसोबतचे फोटो केली शेअर - मॅथियास बोए

Taapsee pannu shared pictures : तापसी पन्नू आणि माजी बॅडमिंटनपटू मॅथियास बोए काही दिवसांपासून त्यांच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहेत. दरम्यान आता सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाली आहेत. या फोटोमध्ये तापसी पन्नूसोबत तिचा कथित बॉयफ्रेंड आणि बहीण शगुन पन्नू दिसत आहेत.

Taapsee pannu shared pictures
तापसी पन्नूनं शेअर केली फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 6:20 PM IST

मुंबई - Taapsee pannu shared pictures : बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि माजी बॅडमिंटनपटू मॅथियास बोए गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांच्या डेटिंगच्या अफवामुळे दोघे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतात, मात्र कधीही तापसीनं आपल्या नात्याविषयी अधिकृतपणे सांगितले नाही. तापसी अनेकदा इंस्टाग्रामवर तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत असते. दरम्यान रविवारी तापसी पन्नू तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोए आणि तिची बहीण शगुन पन्नू यांच्यासोबत मुंबईतील एका हॉलेटमध्ये जाताना दिसली. हे तिघेही लंच डेटचा आनंद घेताना दिसले.

तापसी पन्नूनं शेअर केली फोटो

तापसी पन्नूनं इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केले फोटो : तापसीनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर मॅथियास बोए आणि शगुन पन्नूसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती शगुन आणि मॅथियासोबत बसलेली दिसत आहे. यावेळी तापसीनं पोझ देत फोटो देखील काढला आहे. फोटोमध्ये तापसीनं फ्लोरल एम्ब्रॉयडरी असलेल्या पीच एथनिक सूट परिधान केला आहे. याशिवाय तिनं यावर लाईट मेकअप केला आहे. या देसी लूकमध्ये तापसी खूप सुंदर दिसत आहे. तर मॅथियासनं बेज पँटसह पांढरी प्रिंटेड शर्ट घातली आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तापसीनं लिहिलं, 'खास दिवस खास लोक खास जागा' शगुन पन्नूनं शेअर केलेल्या आणखी काही फोटोमध्ये ती तापसीसोबत सेल्फी काढताना दिसत आहे.

तापसी पन्नूनं शेअर केली फोटो

तापसी पन्नू 'डिंकी'मध्ये शाहरुख खानसोबत दिसणार : तापसी आणि तिचा बॉयफ्रेंड मॅथियास यापूर्वी मालदीवला देखील गेले होते. त्यांचे काही मालदीवमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर आणखी या डेटिंगच्या अफवांला हवा मिळली होती. दरम्यान तापसी पन्नू लवकरच शाहरुख खानसोबत राजकुमार हिरानीच्या 'डिंकी' चित्रपटात दिसणार आहे. किंग खानचा हा चित्रपट देखील रूपेरी पडद्यावर खूप कमाई करेल असा अंदाज वर्तविला जात आहे. तापसी पन्नूला या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. याशिवाय ती 'आय हसिना दिलरुबा' आणि 'वो लड़की है कहाँ' आणि 'हसीन दिलरुबा'च्या सीक्वलमध्येही दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Elvis yadav and Arjun bijlani : 'बिग बॉस ओटीटी 2' फेम एल्विश यादवनं दिली अर्जुन बिजलानीच्या ट्विटवर प्रतिक्रिया...
  2. Sunny Deol : सन देओल धर्मेंद्रसोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर, पिझ्झा खातानाचा फोटो व्हायरल
  3. Khufiya trailer out : तब्बू आणि अली फजल स्टारर 'खुफिया'चा ट्रेलर झाला प्रदर्शित...

ABOUT THE AUTHOR

...view details