मुंबई - निर्माता दिग्दर्शक राज आणि डीके यांची बहुचर्चित वेब सिरीज गन्स अँड गुलाब मालिकेचा व्हिडिओ शुक्रवारी रिलीज करण्यात आला. ही एक अफलातून गँगस्टर कॉमेडी असल्याचे शीर्षकावरुन लक्षात येते. यात सत्तरच्या दशकातील गाणी, रोमँटिक प्रेमी जोडपे आणि गँगस्टर मध्यवर्तीत कथा पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्सच्या या वेब सिरीजमध्ये राजकुमार राव, दुल्कर सलमान, आदर्श गौरव, टीजे भानू आणि गुलशन देवय्या मुख्य भूमिका साकारत आहेत.
दुल्कर सलमाननने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत या वेब सिरीजच्या ट्रेलर लॉन्चची तारीख कळवली आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिरीजची एक झलक शेअर करत त्याने लिहिलंय, 'या अजब दुनियेबद्दल एका शब्दात सांगायचे झाले तर राज आणि डीके यांनी भन्नाट एंटरटेन्मेंची निर्मिती केली आहे. गन्स अँड गुलाबचा ट्रेलर २ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज केला जाणार आहे.'
गन्स अँड गुलाबचा हा व्हिडिओ एका रेट्रो म्यूझिकने सुरू होतो. यात राजकुमार राव हटके हेअर स्टाइल आणि हातात बंदुक धरुन नव्या अवतारात पाहायला मिळत आहे. मोशन पोस्टर प्रमाणे व्हिडिओमध्ये उडणारी हत्यारे, काचेचे साहित्य. परफ्युम, कार्ड्स, जुन्या कॅसेट्स, प्रेम पत्रे, चाकू हे टेस्टींग झोनमध्ये दिसतात आणि बंदुकीची गोळी, सर्वत्र पसरलेले रक्त आणि गुलाबाची फुले मोशनमध्ये दिसतात. वायू अॅटो वर्क हा साइनबोर्डही पाहायला मिळतो. व्हिडिओमध्ये पुढे गुलशन देवय्याची ७० च्या दशकातील हेअर स्टाइल आणि ड्रेसही दिसतो.
यात दुल्कर सलमान कणखर आणि रांगडा दिसत आहे. खुनापासून ते पहिल्या चुंबनापर्यंत गुलाबगंजमध्ये भरपूर राडे होताना दिसतात. या मालिकेत श्रेया धन्वंतरी आणि पूजा गौर यांच्याही भूमिका आहेत. नेटफ्लिक्सवरी ही मालिका प्रसारित होणार आहे.