मुंबई- 'दृश्यम 2'च्या निर्मात्यांनी आगामी चित्रपटातील अक्षय खन्नाचा लूक उघड केला आहे. बुद्धिबळाच्या पटलावर पुढच्या वाटचालीची योजना आखताना हा अभिनेता चिंताग्रस्त लूकमध्ये दिसत आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शन करत असलेल्या दृष्यम २ च्या पोस्टरमध्ये अक्षय खोलवर विचार करत असून शत्रूला आपल्या जाळ्यात अडकवण्याची नवी चाल शोधताना दिसत आहे.
अभिनेता अक्षय खन्नच्या व्यक्तिरेखेबद्दल तपशील अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत. थ्रिलरच्या पहिल्या भागात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता, मृणाल जाधव आणि रजत कपूर यांच्या भूमिका असलेल्या फ्रँचायझीमध्ये अक्षय खन्ना नवीन प्रवेश करत आहे. पहिल्या भागाप्रमाणेच, 'दृश्यम 2' हा चित्रपटदेखील मोहनलाल अभिनीत त्याच नावाच्या प्रसिद्ध मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.