Dream Girl 2 box office day 7: मुंबई -आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल 2' हा रूपेरी पडद्यावर खूप कमाई करत आहे. 7 दिवसांत या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत कोणतीही कसर सोडत नाही. त्यामुळेच या चित्रपटाने अवघ्या 4 दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'ड्रीम गर्ल 2'ने जगभरात 70 कोटींची कमाई केली आहे. आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत आहे. यापूर्वी आयुष्मान खुरानाचे चित्रपट रूपेरी पडद्यावर काही खास कमाल करू शकले नाही, त्यामुळे त्याला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहे. हा चित्रपट रूपेरी पडद्यावर 100 कोटीची लवकरच कमाई करेल असे दिसत आहे.
'ड्रीम गर्ल 2'चे एकूण कलेक्शन
पहिला दिवस 10.69 कोटी
दुसरा दिवस 14.02 कोटी
तिसरा दिवस 16 कोटी
चौथा दिवस 5.42 कोटी
पाचवा दिवस 5.87 कोटी
सहावा दिवस 7.5 कोटी
सातवा दिवस 6.50 कोटी
चित्रपटाचे एकूण 66.00 कोटी
'ड्रीम गर्ल 2'ची कमाई : सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी देशांतर्गत 6.50 कोटी रुपयांची कमाई करू शकेल. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 66 कोटी होईल. 'ड्रीम गर्ल 2'ची 1 ऑगस्ट रोजी हिंदी मार्केटमध्ये एकूण 12.01% व्यापी होती.'ड्रीम गर्ल 2'ने बॉक्स ऑफिसवर 'गदर 2'चा सामना केला आहे. आता सध्या 6 सप्टेंबरपर्यत 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो कारण त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी सुपरस्टार शाहरुख खानचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'जवान' हा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. 35 कोटी रुपयांच्या बजेटवर बनवलेले, 'ड्रीम गर्ल 2'ने चित्रपटाच्या बजेट पेक्षा जास्त कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे.
'ड्रीम गर्ल 2'चा जादू : याशिवाय रक्षाबंधनाच्या सुट्टीच्या मुहूर्तावर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. सध्याच्या ट्रेंडवरून हे देखील कळते की प्रेक्षकांना यशस्वी चित्रपटांचे सीक्वल देखील आवडतात. या चित्रपटामधील गाणे देखील खूप हिट झाली आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपगृहांमध्ये आताही गर्दी करत आहे.
हेही वाचा :
- Nayanthara Instagram Debut : नयनताराचे इन्स्टाग्रामवर पदार्पण, 'जवा पोस्टसह पोस्ट केला जुळ्या मलांसोबतचा धमाल व्हिडिओ
- Sushant Singh Rajput Sister Shweta Singh Kirti : रक्षाबंधनावर सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीची भावनिक पोस्ट...
- trailer of Jawan : 'जवान' चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज, शाहरुखच्या अॅक्शनसवर चाहते फिदा