Dream Girl 2 Box Office Collection Day 11 : 'ड्रीम गर्ल 2' आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' हा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. 'ड्रीम गर्ल 2' ने पहिल्या 4 दिवसात चित्रपटाचे बजेट वसूल केले. आता हा चित्रपट 100 कोटीची कमाई करण्यापासून काही पाऊलावर आहे. 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाचे एकूण बजेट 35 कोटी होते. हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आणि आजपर्यंत या चित्रपटाने भरपूर कमाई केली आहे. 'ड्रीम गर्ल 2'मधील आयुष्मान खुरानाचा अभिनय हा प्रेक्षकांना आवडत आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे व्यतिरिक्त परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, अभिषेक बॅनर्जी, अन्नू कपूर हे देखील कलाकार आहेत.
'ड्रीम गर्ल 2'चे कलेक्शन :आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 10.69 कोटी, दुसऱ्या दिवशी 14.02 कोटी, तिसऱ्या दिवशी 16 कोटी, चौथ्या दिवशी 5.42 कोटी, पाचव्या दिवशी 5.87 कोटी, सहाव्या दिवशी 7.5 कोटी, सातव्या दिवशी 7.5 कोटी, आठव्या दिवशी 4.7 कोटी, नव्या दिवशी 6.36 कोटी , दहाव्या दिवशी 8.34 कोटीचा गल्ला जमावला आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 86.06 कोटी इतके झाले आहे. हा चित्रपट अकराव्या दिवशी 3.00 कोटीची कमाई करू शकतो असा अंदाज बांधला जात आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 89.40 कोटी होईल.