महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Dream Girl 2 box office collection : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल २'चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन... - Ayushmann Khurrana

आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'ड्रीम गर्ल २'ने पहिल्याच दिवशी चाहत्यांचे मने जिंकली. राज शांडिल्य दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

Dream Girl 2
ड्रीम गर्ल २

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 12:22 PM IST

मुंबई :आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल २' हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आयुष्मानचा हा चित्रपट २०१९ च्या हिट चित्रपट 'ड्रीम गर्ल'चा सीक्वल आहे. 'ड्रीम गर्ल' २८ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २०० कोटींची कमाई केली होती. त्याचबरोबर आता 'ड्रीम गर्ल २'ची ओपनिंगही चांगली झाली आहे. चला जाणून घेऊया आयुष्मान स्टारर चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली तर...

'ड्रीम गर्ल २'ची रिलीजच्या पहिल्या दिवसाची कमाई :'गदर २' आणि 'ओ माय गॉड २' गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहेत. या दोन चित्रपटांदरम्यान, राज शांडिल्य दिग्दर्शित 'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. 'ड्रीम गर्ल २' मधील पूजा ही प्रेक्षकांवर चांगलीच जादू करत आहे. या चित्रपटाची सुरुवातही चांगली झाली आहे. त्याचबरोबर आता 'ड्रीम गर्ल २'च्या रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'ड्रीम गर्ल २' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर ९.७ कोटी रुपये कमवले आहेत.

'ड्रीम गर्ल २'ची जादू 'गदर २'च्या पुढेही कायम :सनी देओलच्या 'गदर २'च्या तुफानी कमाईसमोर, 'ड्रीम गर्ल २'चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन चांगले मानले जात आहे. दरम्यान, वीकेंडला 'ड्रीम गर्ल २' ची कमाई वाढेल आणि एक उत्तम कलेक्शन करेल अशी अपेक्षा केली जात आहे. आता 'ड्रीम गर्ल २' बॉक्स ऑफिसवर 'गदर २'च्या पुढे किती कमाई करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांच्याशिवाय परेश रावल, अनु कपूर, राजपाल यादव, असरानी, ​​सीमा पाहवा, विजय राज, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी, रंजन राज आणि मनोज जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

  1. हेही वाचा :
  2. Actor Milind Safai passes away ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन; मराठी मालिकांसह चित्रपटांमध्ये पाडली होती छाप
  3. National Film Awards 2023 : 'हे' २ मराठी चित्रपट ठरले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ चे मानकरी; जाणून घ्या असं काय आहे या चित्रपटात...
  4. Seema Haider News: सीमा-सचिनच्या चित्रपटाचं शीर्षकच इम्पानं नाकारलं; निर्माते म्हणाले, 'मनसेमुळे...

ABOUT THE AUTHOR

...view details