महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Dream girl 2 box office collection 14 day : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2'च्या कमाईत झाली घट... - ड्रीम गर्ल 2

Dream girl 2 box office collection 14 day : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट 100 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यापासून काही पावलांवर आहे. दरम्यान आता 'ड्रीम गर्ल 2'ला रुपेरी पडद्यावर 'जवान' चित्रपटाचा सामना करावा लागणार आहे.

Dream girl 2 box office collection 14 day
ड्रीम गर्ल 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 14

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 7:09 PM IST

मुंबई Dream Girl 2 box office collection day 13 : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर रोमँटिक कॉमेडी 'ड्रीम गर्ल 2'ला दोन आठवडे पूर्ण होण्याआधीच, शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट देशांतर्गत 100 कोटींचा टप्पा ओलांडण्यापासून काही पावलावर आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. हा चित्रपट एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवला गेला आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुरानाने आणि इतर कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला आहे. 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटाचं खूप कौतुक सोशल मीडियावर आयुष्मानचे चाहते करत आहेत.

'ड्रीम गर्ल 2'ची एकूण कमाई : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर या चित्रपटाने रिलीजच्या बाराव्या दिवशी 3 कोटीची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाने तेराव्या दिवशी 2.73 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 94.51 कोटी झाले आहे. बुधवारी, 'ड्रीम गर्ल 2'चा हिंदी मार्केटमध्ये एकूण व्याप 12.59% होता. दरम्यान, जगभरातील 'ड्रीम गर्ल 2'ने 118.86 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट 14व्या दिवशी 1.00 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस एकूण कलेक्शन 95.69 कोटी होईल. 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटाकडून आयुष्मानला खूप अपेक्षा आहे. कारण यापूर्वीचे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकलेले नाहीत.

'ड्रीम गर्ल'चा सीक्वल :'ड्रीम गर्ल 2' हा 2019 मध्ये रिलीज झालेला 'ड्रीम गर्ल सीक्वल'चा आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे व्यतिरिक्त अन्नू कपूर, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, सीमा पाहवा, मनोज जोशी आणि विजय राज यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आता बॉक्स ऑफिसवर 'ड्रीम गर्ल 2'ला 'जवान'चा सामना करवा लागणार आहे. 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट 35 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता, त्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. मात्र सध्या 'जवान' क्रेझमुळे या चित्रपटाच्या कमाईमध्ये नक्कीच परिणाम होणार असे दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Jawan Box Office Collection : पहिल्याच दिवशी शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट घेणार मोठी झेप...
  2. Jawan Day १ Box Office : शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट चाहत्यांवर करत आहे जादू...
  3. Shah Rukh Khan Jawan Movie : 'जवान' चित्रपटाद्वारे शाहरुख खाननं जिंकली चाहत्यांची मनं...

ABOUT THE AUTHOR

...view details