मुंबई Dono Trailer out : अभिनेता सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर आणि पूनम ढिल्लॉनची मुलगी पलोमा 'दोनो' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटासाठी राजवीर आणि पलोमा खूप उत्सुक आहे. राजश्री बॅनरखाली केलेल्या 'दोनो' चित्रपटाचा ट्रेलर 4 सप्टेंबरला प्रदर्शित झाला. राजश्री आणि जिओ स्टुडिओची निर्मिती हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल. मुंबईत झालेल्या 'दोनो'च्या ट्रेलर लॉन्चला सनी देओलही उपस्थित होता. हा चित्रपट अवनीश एस बडजात्याने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे ट्रेलर इंस्टाग्राम, यूट्यूब आणि ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे. 'दोनो'चे ट्रेलर चाहत्यांना खूप पसंत पडले आहेत.
'दोनो'चा ट्रेलर प्रदर्शित : 'दोनो'चा टायटल ट्रॅक जेव्हा रिलीज झाला होता, तेव्हा सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धनने इंस्टाग्राम अकाउंट शेअर करत या चित्रपटासाठी राजवीर आणि पलोमाला शुभेच्छा दिल्या होत्या. सलमान आणि भाग्यश्री या दोघांनीही आपल्या करिअरची सुरुवात 'मैने प्यार किया' मधून केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या चित्रपटामध्ये सलमान आणि भाग्यश्रीची जोडी चाहत्यांनी खूप पसंत केली होती. दरम्यान 'दोनो'च्या ट्रेलरमध्ये राजवीर हा देवच्या पात्रामध्ये दिसत आहे, तर पलोमा ही मेघनाच्या भूमिकेत आहे. हे दोघे आपल्या मित्र आणि मैत्रिणीच्या लग्नात जातात आणि तिथेच या दोघांना प्रेम होते.