मुंबई - अभिनेता गोविंदा सध्या सोशल मीडियावर भरपूर ट्रोल झाला आहे. त्याच्या नावच्या एका अनव्हेरीफाइड ट्विटर अकाउंटवरून प्रसिद्ध झालेल्या एका ट्विटने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये झालेल्या हिंसाचाराशी संबंधित २ ऑगस्ट रोजी हे ट्विट करण्यात आले होते.
या ट्विटमध्ये शांतता आणि एकतेचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींबद्दल निराशा व्यक्त करताना दिसला. मात्र त्याने तातडीने दावा केला की त्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यामुळे हे वादग्रस्त ट्विट झाले. त्यानंतर त्याने हे ट्विटर अकाउंट डीअॅक्टीव्हेट केले. हरियाणातील नूह जिल्ह्यात जातीय हिंसाचार उसळला असून त्या पार्श्वभूमीवर हे ट्विट आल्याने गोंधळ वाढला. गोविंदाच्या या तथाकथित ट्विटने आगीत तेल टाकण्याचे काम केले व सध्या सुरू असलेल्या या हिंसाचाराकडे सर्वांचे लक्ष वेधले.
गोविंदाच्या उकाउंटवरील हे कथित ट्विट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्क्रीनशॉट आणि रीट्विट्सद्वारे व्हायरल झाले. त्यामुळे त्याला टीका आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी गोविंदाने इन्स्टाग्रामचा आधार घेतला आणि त्याने हे ट्विट केले नसल्याचे सांगितले.
इन्स्टाग्रामवर एक व्ह्डिओ शेअर करुन स्पष्ट केले की, 'कुणी तरी माझे ट्विटर उकाउंट हॅक केले होते, याबद्दल मी सायबर क्राईमकडे तक्रार करत आहे. माझ्या हरियाणातील सर्व चाहत्यांना सांगतो की, मी वर्षानुवर्षे वापरत नसलेले ट्विटर अकाउंट कुणी तरी हॅक केले आहे. माझ्या टीमनेही याला नकार दिला आहे. ते लोक असे नाहीत की मला न विचारता माझ्या नावे ट्विट करतील. त्यामुळे हे प्रकरण सायबर क्राईमकडे सोपवत आहे. ते यात लक्ष घालतील आणि तपास करतील. असे असू शकते की, आता निवडणुकीचे वातावरण येणार आहे. कुणाला असे वाटले असेल की मी कुठल्या तरी पक्षाकडून पुढे येऊ नये, त्यामुळे त्यांनी असे केले असावे, असे मला वाटते. परंतु, हे ट्विटर अकाउंट हॅक झालेले आहे. मी असे कधी करत नाही. कुणासाठीही असे करणार नाही.'