मुंबई - दक्षिण भारतातील तगडा कलाकार प्रभास आणि बॉलिवूड मधील अभिनेत्री क्रीती सेनॉन यांच्या जबरदस्त अभियानाचा चित्रपट आदी पुरुष प्रदर्शनापूर्वीच गाजत आहे. मात्र या चित्रपटासाठी सहभागी असणाऱ्या दोन कंपन्यांमधील वाद मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला. त्रिशूल एंटरटेनमेंट मीडिया कंपनी तसेच व्हिएफएक्स कंपनी यांच्यामधील वादावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंटला नुकसान भरपाई बाबत आज कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.
आदिपुरुष हा चित्रपट बहुभाषिक आहे म्हणजे भारतातील पाच ते सात पेक्षा अधिक भाषांमधून तो तयार झालेला आहे. रामायणावर आधारित हा चित्रपट आहे. आणि प्रदर्शनाच्या आधीच लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. परंतु या चित्रपटाच्या साठी जे निर्माता कंपन्या होत्या त्यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे. यासंदर्भात त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंट यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यांची मागणी अशी होती की 'या चित्रपटाच्या आधी व्हीएफएक्स स्टुडिओसोबत आमचा करार झालेला होता. त्यामुळे त्रिशूल मीडियाला त्यांच्या हक्काचे नुकसान भरपाईचे चार कोटी 77 लाख 31 हजार रुपये थकबाकी आहे ते दिले पाहिजे. अन्यथा या चित्रपटाबाबत वाद वाढत जाईल व अडथळा येईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर छागला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंट यांच्या वतीने बाजू मांडणारे वकील अभिनव चंद्रचूड यांनी नमूद केले की, चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यासंदर्भात कोणताही अडथळा आणण्याचा विचार त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंटचा नाही. परंतु त्यांच्या हक्काचे आणि त्यांचे थकबाकीचे चार कोटी ७७ लाख ३१ हजार ३२१ रुपये हे व्हीएफएक्स स्टुडिओने ठरल्याप्रमाणे द्यायला पाहिजे.
तर या संदर्भात सहनिर्माता असलेली भारतातील प्रख्यात ध्वनिमुद्रण कंपनी टी सिरीज अर्थात सुपर कॅसेट प्रायव्हेट लिमिटेड हे देखील आदीपुरुष चित्रपटाशी संबंधित आहे. त्यामुळे या याचिकेमध्ये त्यांना देखील पक्षकार केल्याशिवाय या खटल्यातील सर्व बाजू समोर येऊ शकत नाही. त्यामुळे न्यायालयाने टी सिरीज यांची पण बाजू ऐकून घेतली पाहिजे, असे टी सिरीजच्या वतीने अधिवक्ता मयूर खांडेकर यांनी बाजू मांडली.
यासंदर्भात याचिका करणारे संकेत सिंग आणि गंधार रायकर यांनी न्यायालया समोर नमूद केले की, आदी पुरुष चित्रपट निर्मितीच्या पुरता तेवढ्या काळासाठीच कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ती कंपनी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे थकबाकी भरण्यासंदर्भात रेट्रोफिल्स त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंट कंपनीला कोणतेही क्रेडिट कसे काय देऊ शकते? तर त्रिशूल मीडिया एंटरटेनमेंट यांच्याकडून दावा मांडण्यात आला की प्रदर्शित झाल्यानंतर कंपनीचा विलय होईल मग आम्हाला थकबाकी मिळणारच नाही. त्यामुळेच हा वाद समोर आलेला आहे.