मुंबई- चपळ आणि लवचिक शरीरयष्ठी, देखणे सौंदर्य, रुगर्विता दिसा पटानी आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. 13 जून 1992 रोजी उत्तर प्रदेशातील बरेली येथे जन्मलेली दिसा आज बॉलिवूडची आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्यावर शुभेच्छा संदेशांचा वर्षव सुरू आहे. दिशा पटानीने यशाचे शिखर कसे सर केले याबद्दल आपण थोडे जाणून घेऊयात.
संधीचे सोने करणारी दिशा - दिशा पटानी एका समृद्ध आणि प्रगतशील घरामध्ये वाढली. तिची आई आरोग्य निरीक्षक आहे तर वडील पोलीस खात्यात अधिकारी आहेत. तिला एक लहान भाऊ असून तो अद्याप शिकत आहे. ग्लॅमरच्या जगाची ओढ तिला अगदी लहानपणापासूनच होती. आपण मोठे होऊन या चमकत्या दुनियेत मिरवावं असं तिला सतत वाटत राहायचं. फेमिना मिस इंडिया स्पर्धेत तिने केवळ भाग घेतला नाही तर २०१३ मध्ये ती मिस इंडिया इंदूरची फर्स्ट रनर अप बनली होती. त्यानंतर तिने एकेक पाऊल आपल्या स्वप्नांच्या दिशेने टाकायला सुरुवात केली. लोफर या तेलुगु चित्रपटात तिला भूमिका करण्याची संधी मिळाली आणि तिने या संधीचे सोने केले. याच दरम्यान तिने टायगर श्रॉफसोबत 'बेफिक्रा' हा पहिला म्युझिक व्हिडिओ केला.
दिशा पटानीचे शिक्षण - दिशा पटानीच्या शिक्षणाकेड पाहिले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्या शिवाय राहणार नाही. तिने लखनौच्या एमिटी युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये शिकत असतानाच तिच्यातील सौंदर्याची जाणीव तिला झाली. इतर मुलींहून आपण वेगळे आहोत याची तिला खात्री पटली होती. आपल्या सौंदर्यांच्या जीवावर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली आणि ग्लॅमरच्या दुनियेत पुढे इतिहास घडत गेला.
बॉलिवूडमधील यशस्वी कामगिरी - 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून दिशा पटानीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार राहिलेल्या महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. यात तिच्या वाट्याला आलेली भूमिका फार मोठी नव्हती परंतु यात ती लक्ष वेधणारी ठरली होती. एमएस धोनीची गर्लफ्रेंड प्रियांका झा ही व्यक्तिरेखा तिने यात साताकारली होती. त्यानंतर जॅकी चानच्या कुंग फू योगा चित्रपटात तिने सोनू सूदसोबत भूमिका केली होती. टायगर श्रॉफसोबत बागी २ चित्रपटात दिशा पटानीची ऑन स्क्रिन केमेस्ट्री बरीच गाजली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कामगिरी करता आला.