मुंबई :'बडे अच्छे लगते हैं २' या मालिकेत प्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा परमार लवकरच आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला आहे. यात तिचा बेबी बंप दिसत आहे. या फोटोमध्ये दिशाने तिचे टॉप वर करून पोट दाखविले आहे. दिशा परमारचा हा फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दिशाच्या पोटावर काढलेला टॅटूही खूप खास आहे. हा फोटो शेअर करताना दिशा परमारने कॅप्शनमध्ये, 'गेटींग देअर.' असे लिहिले आहे. दिशाने काही महिन्यांपूर्वीच तिच्या गरोदरपणाबद्दल खुलासा केला होता.
दिशाचे टॅटू :दिशा परमारने पोट दाखवताच लोकांच्या नजरा तिच्या पोटावरील टॅटूवर पडल्या आहेत. दिशाने राहुलच्या नावाने हा टॅटू बनवला असून, त्याकडे लोकांचे लक्ष लगेच जात आहे. दिशाच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. दिशाच्या येणाऱ्या बाळाबद्दल अनेक चाहत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी 'बेबी बॉय' तर काहींनी दिशाला 'बेबी गर्ल' असं म्हटलं आहे. एका चाहत्याने कमेंट करत 'तुमच्या घरी मुलगा येतोय' असे लिहिले. आणखी दुसऱ्या चाहत्याने लिहिले आहे. 'तुमच्या कुटुंबात मुलगी येणार आहे मॅडम.'अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत.