महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दिग्दर्शक रोहित शेट्टीने शेअर केला न पाहिलेला थ्रोबॅक फोटो - Khataron Ke Khiladi 12

दिग्दर्शक रोहित शेट्टीचे अॅक्शन प्रेम आपल्या सर्वांना माहिती आहे. अद्भूत आणि भव्य स्टंट्स त्याच्या सिनेमात आपण नेहमीच पाहात आलो आहोत. काही गोष्टी कधीत बदलत नाहीत, असे म्हणत त्याने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. यावर सेलेब्रिटींसह चाहते कमेंट करीत आहेत.

दिग्दर्शक रोहित शेट्टी
दिग्दर्शक रोहित शेट्टी

By

Published : Jul 11, 2022, 4:56 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा दिग्गज दिग्दर्शक रोहित शेट्टी सोमवारी आठवणींच्या जगात फिरताना दिसला. त्याने त्याच्या अॅक्शनच्या झलकसह 'तेव्हा आणि आता' असे थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर रोहितने एक कोलाज फोटो शेअर केला ज्याला त्याने कॅप्शन दिले, "काही गोष्टी कधीत बदलत नाहीत...".

थ्रोबॅक फोटोत दोन प्रतिमांचा कोलाज आहे, एक 2002 मधील आणि दुसरी 2022 मधील आणि एकमेव गोष्ट जी अपरिवर्तित दिसते ती म्हणजे दिग्दर्शकाचे अॅक्शनबद्दलचे प्रेम.

डाव्या फोटोत, 'गोलमाल रिटर्न्स'चा दिग्दर्शक शूटिंगच्या ठिकाणी लाल टी-शर्टमध्ये उंच उडी मारताना दिसतो, तर दुसऱ्या फोटोत तो कारच्या वरती तशीच उडी मारताना दिसतो.

रोहित शेट्टीने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांकडून कमेंट विभागात हार्ट आणि फायर इमोटिकॉन्सचा पूर आला आणि त्याच्या फिटनेसबद्दल दिग्दर्शकाचे कौतुक केले.

अभिनेता रणवीर सिंग याने कमेंट केली, "आणि त्यामुळे आम्हाला आनंद होतो! हे पाहायला आवडते !" त्यानंतर हार्ट-आय इमोटिकॉन.

दुसर्‍या चाहत्याने लिहिले की, "क्रेझी कधीच बदलत नाही सर."

दरम्यान, वर्क फ्रंटवर, 49 वर्षीय दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या दक्षिण आफ्रिकेत त्याच्या साहसी रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी सीझन 12' च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

रणवीर सिंग, जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका असलेला त्याचा पुढचा दिग्दर्शकीय चित्रपट 'सर्कस' 2022 च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. अलीकडेच रोहितच्या मोठ्या OTT दिग्दर्शकीय पदार्पणाची घोषणा केली, 'इंडियन पोलिस फोर्स', ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत होते. ही मालिका केवळ Amazon Prime Video वर स्ट्रीम केली जाईल.

हेही वाचा -सलमान खान मराठीत झळकणार, रितेश देशमुखच्या ‘वेड’चे चित्रीकरण झाले पूर्ण!

ABOUT THE AUTHOR

...view details