हैदराबाद- सुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील आचार्य नागार्जुन विद्यापीठातून बीटेक पूर्ण केल्यानंतर ३७ वर्षांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. RGV या नावाने प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शकाने त्याच्या पदवी प्रमाणपत्राचा फोटो ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. त्याच्या या पोस्टला 5.8 दशलक्ष चाहत्यांनी प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला आहे.
37 वर्षांनंतर बी टेक पदवी प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल तो खूप उत्साहित असल्याचे दिग्दर्शक रामूने सांगितले आणि त्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले. मी उत्तीर्ण झाल्यानंतर 37 वर्षांनंतर आज माझी बी टेक पदवी मिळवून खूप आनंदी झालोय. मी 1985 मध्ये पदवी घेतली नाही कारण मला सिव्हिल इंजिनिअरिंगचा सराव करण्यात रस नव्हता.. आचार्य नागार्जुन विद्यापीठाचे खूप आभार, असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्माने जुलै 1985 मध्ये बी टेक (सिव्हिल इंजिनीअरिंग) परीक्षा द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण केली होती.
त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, 'एका युजरने लिहिले, छान.. आम्ही सिव्हिल इंजिनिअर्स सर्टिफिकेट्सची काळजी करत नाही. आम्ही फक्त जग तयार करतो... पण मी पूर्ण झाल्यानंतर लगेचच माझे सिव्हिल इंजिनिअर्सचे प्रमाणपत्र घेतले होते.' त्याच्या चित्रपटात असलेल्या काही इमारतींचा उल्लेख करत दुसऱ्याने लिहिले, सिव्हिल इंजिनीअरिंग! याच कारणामुळे तुम्ही तुमच्या आधीच्या काही चित्रपटांमध्ये बांधकामाधीन इमारती/स्ट्रक्चर्स सारखी ठिकाणे वापरली होती. RGV ने त्याच्या ट्विटर हँडलवर विद्यापीठाच्या प्राध्यापकांसोबतची काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत.
राम गोपाल वर्माने आपल्या कारकिर्दीची सुरुवात तेलुगू सिनेमातून केली. त्याने 1989 मध्ये त्याच्या शिवा या डेब्यू सिनेमाने देशभर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला. आमिर खान आणि उर्मिला मातोंडकर अभिनीत रंगीला हा त्याचा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला मोठा हिट चित्रपट होता. सत्या, सरकार, सरकार राज, कंपनी, रंगीला, निशब्द, आग, डिपार्टमेंट आणि नाच यासारखे चित्रपट राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केले होते.
हेही वाचा -Hera Pheri 3 : हेरा फेरी 3 मध्ये संजय दत्तची एन्ट्री; करणार त्याच्या कॉमेडी अभिनयाची सुरूवात