महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Nagraj Manjule : 'दिग्दर्शक वादग्रस्त चित्रपटांची निर्मिती करून समाजात वाद निर्माण करतात' - Nagraj Manjule criticize on The kashmir files

द कश्मीर फाईल (The Kashmir Files) सारख्या चित्रपटांची निर्मिती करत दिग्दर्शक समाजात हिंदू-मुस्लीम ही तेढ निर्माण करत आहेत. भारत हा एकसंध देश असून प्रेमाने समाजात राहण्याची जास्त गरज असल्याचे वक्तव्य दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule in Pune) यांनी केले.

Nagraj manjule
Nagraj manjule

By

Published : May 1, 2022, 5:44 PM IST

पुणे - दकश्मीर फाईल (The Kashmir Files) सारख्या चित्रपटांची निर्मिती करत दिग्दर्शक समाजात हिंदू-मुस्लीम ही तेढ निर्माण करत आहेत. भारत हा एकसंध देश असून प्रेमाने समाजात राहण्याची जास्त गरज असल्याचे वक्तव्य दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule in Pune) यांनी केले. नुकतेच पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या संवाद साधत होते.

नागराज मंजुळेची प्रतिक्रिया

समाजात विविध गोष्टींवर चित्रपट तयार केले जातात. समाज हा चित्रपटांचा केंद्रबिंदू असतो. मात्र या चित्रपटातून नेमकं समाजाला काय द्यायचं हे मात्र, दिग्दर्शक ठरवतो.दिग्दर्शकाने समाजाची चांगली बाजू समोर ठेवून चित्रपट बनवावे, असेही त्यांन सांगितले.प्रेम हाच जगण्याचा मार्ग, एकमेकावर प्रेम करत रहावे : नागराज मंजुळे

भोंग्यावरून राजकारण
प्रेम हाच जगण्याचा मार्ग आहे. एकमेंकावर प्रेम करत रहावे, मी असे म्हटल्यावर देखील आपली भांडण होतील. तुम्ही ज्यावेळी मला विचारता तेव्हा माझे मत विचारणार आणि त्याची हेडलाईन करणार, मी काही म्हणेल. जे समाजात दिशादर्शक माणसं आहेत. त्यांना लोकांची मते विचारण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

दहा वर्षात खूप शिकलो
चित्रपटसृष्टीत येऊन 10 वर्ष उलटून गेली. पिस्तूल्यापासून सुरुवात झालेली. ती आज झुंड चित्रपट प्रेक्षक करिता आणला.या दहा वर्षात खूप शिकत आलो आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावर काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत अनेक महान अभिनेत्यांचे चित्रपट पाहिले आहे.

हेही वाचा -Janhvi Kapoor Dance Video : इन आखों की मस्ती में..सादर करत जान्हवीने दिल्या शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details