मुंबई - Special screening of jawan : शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट हा रूपेरी पडद्यावर सध्या धुमाकूळ घालत आहे. दिग्दर्शक अॅटलीनं मुंबईत सैनिकांसाठी 'जवान'चं खास स्क्रिनिंग आयोजित केलं होतं. ज्यामध्ये भारतीय लष्कराचे सैनिक, पोलीस अधिकारी आणि वाहतूक पोलीस कर्मचारी हे उपस्थित होते. हा चित्रपट सेलिब्रिटींपासून तर सर्व सामान्य लोकांना खूप आवडत आहे. 'जवान' 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे.
अॅटलीनं आयोजित केलं स्पेशल स्क्रीनिंग :पोलीस अधिकारी, भारतीय लष्कर आणि वाहतूक पोलिसांनी 'जवान' पाहिल्यानंतर खूप सकारात्मक प्रतिसाद दिला. याशिवाय चाहत्यांच्या देखील या चित्रपटाचा चांगला रिव्ह्यू दिला आहे. दरम्यान शाहरुखने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहलं, 'जवानसाठी तुमचं प्रेम आणि कौतुक केल्याबद्दल धन्यवाद, सुरक्षित आणि आनंदी रहा... कृपया चित्रपटाचा आनंद घेत असलेल्या तुम्हा सर्वांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवत रहा. आणि मी लवकरच सर्वांना भेटण्यासाठी परत येईन. तोपर्यंत 'जवान'सोबत थिएटरमध्ये पार्टी करा, खूप प्रेम आणि कृतज्ञता. असं शाहरुखनं चाहत्यासाठी एक पोस्ट केली आहे.