मुंबई- Bigg Boss 17 New Promo: 'बिग बॉस 17'च्या घरात प्रत्येक स्पर्धकामध्ये भांडणं पाहायला मिळत आहेत. मैत्रीपासून प्रेमापर्यंतच्या प्रत्येक नात्याचे रंग या शोमध्ये पाहायला मिळतात. अलीकडेच बिग बॉसमध्ये स्पर्धकांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. बिग बॉसच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये प्रेक्षकांना असे काही पाहायला मिळाले, ज्यामुळं सर्वांना धक्का बसला. अभिषेक आणि विकी जैन यांच्यात वाद सुरू होता, तर त्यांच्याजवळ बेडवर पडलेला अरुण त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देतो. त्यानंतर विकी आणि अभिषेक हे शांत होतात. विकी वारंवार अरुणला गप्प बसायला सांगतो.
विकी जैननं अंकिता लोखंडेला मारण्याचा केला प्रयत्न : या भांडणाच्या वेळी अंकिता लोखंडे देखील विकीला वारंवार समजावून शांत राहण्यास सांगते. यावर विकी आपला संयम गमावून बसतो आणि काहीही विचार न करता तो अंकितावर हात उगारण्याचा प्रयत्न करतो. विकी जैनच्या या कृतीनं अंकिताही घाबरली. यानंतर, विकी रागानं बेडवरून उठतो आणि अभिषेकला दुसऱ्या बाजूला चल म्हणतो. विक्की जैनचं असे वागणे पाहून अरुणही थक्क होतो आणि म्हणतो, ''अरे देवा, हे काय बघायला मिळाले''. विकी जैन हा बिग बॉसच्या घरात अनेकदा आक्रमक होतो. अंकिता आणि विकीमध्ये अनेकदा बिग बॉसच्या घरात वाद होताना दिसतात.