मुंबई - पॉप आयकॉन रिहाना ( Pop icon Rihanna ) आणि RRR चित्रपटातील नाटू नाटू हे गाणे ( Naatu Naatu ) गोल्डन ग्लोब्स ( Golden Globes 2023 ) बेस्ट ओरिजिनल गाण्याच्या ट्रॉफीच्या शर्यतीत होते. नाटू नाटू गाणे विजेते म्हणून घोषित झाल्यानंतर, रिहानाने अनेकांच्या मते, गोल्डन ग्लोब्समध्ये आरआरआर टीमला दुर्लक्षित केले. RRR स्टार राम चरण ( Ram Charan ) यांची पत्नी आणि उद्योजक उपासना कामिनेनी ( Upasana Kamineni ) यांनी शेअर केलेला व्हिडिओ मात्र काही वेगळेच सूचित करतो.
पॉप आयकॉन-टर्न-मेकअप मोगल रिहाना, हिला तिच्या ( Black Panther ) ब्लॅक पँथर : वाकांडा फॉरएव्हर अँथम लिफ्ट मी अपसाठी ( anthem Lift Me Up ) गोल्डन ग्लोब्स बेस्ट ओरिजिनल सॉन्ग ट्रॉफीसाठी नामांकन मिळाले होते. हा विजय आरआरआर टीमने संपादन केल्यानंतर रिहानाने अंतिम विजेत्यांकडे दुर्लक्ष केल्याचे काही जणांना वाटत आहे.
गोल्डन ग्लोब ( Golden Globes 2023 ) लाइव्ह पाहण्यासाठी बुधवारी सकाळी लवकर उठलेल्या सर्वांमध्ये हा वादविवाद सुरू असताना, आपण पाहिले की रिहाना तिचा बॉयफ्रेंड A$AP रॉकीसोबत, RRR टेबलवर थोड्यावेळासाठी थांबली. यावेळी तिचे राम चरणने स्वागत केले. तिने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या ट्रॉफीच्या विजेत्यांचे अभिनंदन केले का याबाबत काहींना शंका वाटते.