मुंबई- बॉलिवूड सेलेब्रिटी कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग गुरुवारी प्रकाश पदुकोण यांच्यासोबत इंडियन ऑनर्स स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये गेले होते आणि या जोडप्याचा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. कार्यक्रमासाठी पोहोचताच रणवीर त्यांच्या कारमधून सर्वात आधी उतरला आणि त्यानंतर दीपिका उतरली. त्याने तिला आपला हात धरायला दिला पण तिने त्याऐवजी तिची साडी पकडणे पसंत केले. तिच्या रोमँटिक हावभावाकडे दुर्लक्ष केल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
अर्थात यानंतर तर्क वितर्कांच्या कमेंट्सची भरमसाठ गर्दी कमेंट विभागात पाहायला मिळाले. दोघांच्या सर्व काही बरे चाललंय का अशी विचारणा सुरू झाली. एकाने लिहिले, 'त्या दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही. कारण हा क्षण कोणत्याही सेलिब्रिटी जोडप्यासाठी संपूर्ण मीडिया आणि लोकांसमोर खूप महत्त्वाचा असतो.' दुसर्याने कमेंट केली, 'त्यांच्यामध्ये काहीतरी बिघडले आहे. त्याने तिचा हात धरण्याची ऑफर दिली आणि तिने दुर्लक्ष केले.' आणखी एका युजरने प्रतिक्रिया दिली, 'कदाचित त्यांच्यात भांडण झाले असेल.'