मुंबई- कंताराच्या प्रचंड यशानंतर, KGF चे निर्माते, होंबाळे फिल्म्स धूमम या चित्रपटाच्या निर्मितीची तयारी करत आहेत. या चित्रपटामध्ये मळ्याळम अभिनेता फहद फासिल आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अपर्णा बालमुरली यांच्या प्रमुख भूमिका असतील. होंबळे फिल्म्स या प्रोडक्शन कंपनीने या चित्रपटाचा फर्स्ट लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. निर्मात्यांनी कॅप्शनसह फर्स्ट लुक शेअर केला आहे: 'आगीशिवाय धूर नाही आणि ही पहिली ठिणगी आहे. धूमम फर्स्ट लूक सादर करत आहे.'कॅप्शन त्यांनी दिलंय.
साऊथ इंडियचित्रपट धूमम - लूसिया आणि यू टर्न या सारख्या समीक्षकांनी प्रशंसित चित्रपट दिग्दर्शित केलेले पवन कुमार या धूमम चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. धूमम हा थ्रिलर मल्याळम, कन्नड, तामिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. टायसन चित्रपटाच्या घोषणेनंतर, धूमम हा चित्रपट मल्याळम चित्रपट उद्योगातील होंबळे फिल्म्सचा दुसरा चित्रपट आहे. फहद आणि अपर्णा व्यतिरिक्त, अच्युत कुमार, देव मोहन, जॉय मॅथ्यू, अनु मोहन आणि नंदू या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. पूर्णचंद्र तेजस्वी या चित्रपटासाठी साउंडट्रॅक कंपोज करतील आणि प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर प्रीथा जयराम छायाचित्रण सांभाळतील. अनीस नादोडी (प्रॉडक्शन डिझाईन) आणि पूर्णिमा रामास्वामी (कॉस्च्युम डिझाईन), या दोन्ही राष्ट्रीय पुरस्कार प्राप्तकर्त्यांनाही या मनोरंजक चित्रपटासाठी सूचीबद्ध करण्यात आले आहे.