मुंबई- 70 आणि 80 च्या दशकातील सुपरस्टार धर्मेंद्र लवकरच एका वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. धर्मेंद्र त्याच्या आगामी वेब सिरीज 'ताज-डिव्हाइड बाय ब्लड' द्वारे OTT वर पदार्पण करणार आहे. अलीकडेच धर्मेंद्रने सोशल मीडियावर त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये तो शेख सलीम चिश्तीच्या गेटअपमध्ये दिसत आहे. हा फर्स्ट लुक शेअर करताना धर्मेंद्रने त्याच्या चाहत्यांकडून त्याच्या वेब सीरिजसाठी शुभेच्छा मागितल्या आहेत.
धर्मेंद्र यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर 'ताज-डिव्हाइड बाय ब्लड' या आगामी वेब सिरीजमधील त्याचा पहिला लूक शेअर केला आहे. लांब ड्रेस, पगडी आणि लांब पांढरी दाढी यामध्ये धर्मेंद्रचा लूक पूर्णपणे वेगळा दिसत आहे. या मालिकेत धर्मेंद्र शेख सलीम चिश्ती ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर नसीरुद्दीन शाह शोमध्ये अकबरच्या भूमिकेत दिसणार आहे.
ट्विटरवर त्याचा फर्स्ट लूक शेअर करताना धर्मेंद्रने लिहिले की, 'मित्रांनो, मी ताज चित्रपटात शेख स्लिम चिश्ती या सुफी संताची भूमिका साकारत आहे. ती एक छोटीशी पण महत्त्वाची भूमिका आहे. तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.' दुसऱ्या ट्विटवर धर्मेंद्र यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'आणखी एक रूप. मला आशा आहे कि तुम्हाला हे आवडेल.' धर्मेंद्रचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. एका ट्विटर युजरने पोस्टच्या कमेंटमध्ये लिहिले की, 'धरम पाजी, एका धार्मिक व्यक्तिरेखेचा कहर केला आहात.' त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, 'धरम जी, हा लूक पाहून मला क्रोधी चित्रपटाची आठवण झाली.'