मुंबई - Dharmendra remembers Raj Kapoor : ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांनी गुरुवारी आठवणींच्या जगात फेरफटका मारला आणि भूतकाळातील दिग्गज अभिनेता राज कपूर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यासोबतचा एक अनमोल थ्रोबॅक फोटो शेअर केला.
इंस्टाग्रामवर धर्मेंद्रने फोटो शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, "हॅप्पी बर्थडे राज साहब.... आम्हाला तुमची आठवण येते! ..... तुम्हाला नेहमी प्रेम आणि आदराने लक्षात ठेवलं जाईल." या मोनोक्रोम फोटोत धर्मेंद्र आणि राज कपूर हस्तांदोलन करताना संभाषण करताना दिसत आहेत. दोघांनीही फॉर्मल सूट घातले होते.
पेशावरमध्ये पृथ्वीराज कपूर आणि रामसरणी मेहरा यांच्या पोटी जन्मलेल्या राज कपूर यांची कारकीर्द उल्लेखनीय होती. त्यांनी भारतातील तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 11 फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले. त्यांना 'भारतीय चित्रपटांचे शोमॅन' म्हणून ओळखले जाते. त्यांनी 'श्री 420', 'आग', 'चोरी चोरी', 'अनारी', 'संगम', 'मेरा नाम जोकर' 'जिस देश में गंगा बहती है', 'जागते रहो', 'बूट पॉलिश' गाजलेल्या 50 हून अधिक चित्रपटात नायकाची भूमिका साकारली होत्या. त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून वकील बाबू, गोपीचन्द जासूस, नसिब, अब्दुल्ला, सत्यम शिवम सुन्दरम यासारख्या 16 चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत.
दरम्यान, धर्मेंद्रबद्दल सांगायचे तर, या दिग्गज स्टारने अलिकडेच त्याचा 88 वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर फिल्म इंडस्ट्री, चाहते आणि कुटुंबीयांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. यामध्ये त्यांची मुलगी ईशा देओल, बॉबी आणि सनी देओल, करण देओल यांच्यासह असंख्य सेलेब्रिटींनी त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या होत्या. धर्मेंद्र आगामी अनटाइटल्ड रोमँटिक ड्रामा चित्रपटात दिसणार आहे ज्यात शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन देखील मुख्य भूमिकेत आहेत. त्याशिवाय, त्याच्याकडे दिग्दर्शक श्रीराम राघवनचा आगामी 'एकीस' हा चित्रपट देखील आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे.
हेही वाचा -
- 'अॅनिमल' चित्रपटातील बॉबी देओलच्या भूमिकेवर वडील धर्मेंद्रनं दिली 'ही' प्रतिक्रिया
- धर्मेंद्रने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस, सनी बॉबीसह 'ड्रीम गर्ल'नेही दिल्या शुभेच्छा
- धर्मेंद्रना 'डार्लिंग पापा' म्हणत, ईशा देओलनं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा