मुंबई -बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते हीमॅन धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता ते ठणठणीत बरे झाल्याची माहिती स्वतः धर्मेंद्र यांनी एक व्हिडिओ ट्वीट करत दिली आहे.
रुग्णालयातून घरी परतले धर्मेंद्र, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती - धर्मेंद्र तब्येतीची अपडेट
बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते हीमॅन धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता ते ठणठणीत बरे झाल्याची माहिती स्वतः धर्मेंद्र यांनी एक व्हिडिओ ट्वीट करत दिली आहे.
![रुग्णालयातून घरी परतले धर्मेंद्र, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती रुग्णालयातून घरी परतले धर्मेंद्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15170455-499-15170455-1651467768643.jpg)
रुग्णालयातून घरी परतले धर्मेंद्र
व्हिडिओत ते म्हणाले, बॅक पेनमुळे मला रुग्णालयात भर्ती व्हावे लागले होते. मात्र, आता मी तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेमुळे बरा झालो आहे. त्यामुळे चिंता करण्याची काहीच गरज नाही. मी माझी काळजी घेईन, असेही धर्मेंद्र म्हणाले.
हेही वाचा -Prema kiran passed away : ‘धुमधडाका’ 'दे दणादण' चित्रपटाच्या नायिका प्रेमा किरण यांचे निधन