मुंबई : सनी देओल स्टारर 'गदर २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान आता 'गदर २' या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. याशिवाय आता सनी देओलच्या कुटुंबामधील सदस्य देखील खूप खुश आहे. २२ वर्षांपूर्वी ' गदर-एक प्रेम कथा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. दरम्यान आता 'गदर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजवत आहे. ' गदर २' या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत १०० कोटींचा टप्पा सहज पार केला आहे. दरम्यान ' गदर २' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या घरी ढोल वाजविल्या जात आहे.
धर्मेंद्र आणि सनीने चाहत्यांचे आभार मानले : ' गदर २'च्या यशाबद्दल सनी देओल आणि याचे वडील धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर सनी देओलने ' गदर २' च्या नावाने बनवलेल्या पुष्पगुच्छाचा फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांना प्रेम व्यक्त केले आहे. दरम्यान या पोस्टवर चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांनी देखील सनीचे आणि ' गदर २'च्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. याशिवाय या पोस्टवर सनीचा धाकटा भाऊ आणि अभिनेता बॉबी देओलने लिहले, लव्ह यू माय तारा सिंग. तसेच या पोस्टवर वडील धर्मेंद्र यांनी लिहिले आहे, 'मित्रांनो, 'गदर २'ला अपार प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद, तुमच्या प्रेमामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला आहे.