महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Dharamveer Mukkam Post Thane : राज्य विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चा संगीत अनावरण सोहळा - राज्य विकास मंत्री तथा आमदार एकनाथ शिंदे

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ( Dharamveer Mukkam Post Thane ) या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील गुरुपौर्णिमा आणि धर्मवीर ही गाणी अविनाश-विश्वजीत या जोडीने संगीतबद्ध केली आहेत. तर गोकुळाष्टमीचं गाणं आणि आनंद हरपला हे मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या जोडीने संगीतबद्ध केलं आहे.

Dharamveer Mukkam Post Thane
Dharamveer Mukkam Post Thane

By

Published : Apr 24, 2022, 2:30 PM IST

मुंबई : नुकताच ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ ( Dharamveer Mukkam Post Thane ) चा संगीत अनावरण सोहळा पार पडला. त्यात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंच्या वेशात घेतलेली एन्ट्री बघून तर सर्वच जण अवाक झाले. लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’च्या टिझरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. दिघे साहेबांच्या नजरेतील ती जरब, चेह-यावरचे ते तेजस्वी कणखर बाण्याचे भाव, त्यांची देहबोली, संवादफेक हे सर्वच प्रसाद ओक यांनी एवढं लिलया साकारलं आहे की साक्षात दिघे साहेबांना बघितल्याचा भास झाला, अशी प्रतिक्रिया आनंद दिघे यांच्या बहिणीने दिली. समाजमाध्यमांवर सत्तर लाखांहून अधिक व्ह्युव्जचा टप्पा या टिझरने ओलांडला. राज्य विकास मंत्री तथा आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे संगीत प्रकाशन पार पाडले.

‘धर्मवीर
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील गुरुपौर्णिमा आणि धर्मवीर ही गाणी अविनाश-विश्वजीत या जोडीने संगीतबद्ध केली आहेत. तर गोकुळाष्टमीचं गाणं आणि आनंद हरपला हे मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या जोडीने संगीतबद्ध केलं आहे. या चित्रपटात एक दमदार पोवाडा असून तो शाहिर नंदेश उमप यांनी संगीतबद्ध केला असून त्यांनीच गायला आहे. या संगीत सोहळ्याप्रसंगी हे सारे मान्यवर उपस्थित होते.

म्युझिक केले लाँच
या चित्रपटाबद्दल आणि प्रसाद ओक यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता वाढलेली असतानाच आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेच्या नावाचा उलगडा या सोहळ्यात करण्यात आला. धर्मवीर आनंद दिघे यांना गुरुच नव्हे तर देव मानणारे आणि सावलीसारखे त्यांच्यासोबत असणारे एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा अभिनेता क्षितिज दाते साकारणार आहे. प्रसाद ओक यांच्याप्रमाणेच क्षितिज दातेचाही लूक एकदम हुबेहुब जुळून आला आहे हे विशेष. मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात अभिनेते प्रसाद ओक आणि क्षितिज दाते त्यांच्या चित्रपटातील लुकमध्ये मंचावर अवतरले. ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी या चित्रपटातील हे सर्व लूक डिझाईन केले आहेत.

यावेळी बोलतांना प्रसाद ओक म्हणाले की, "आपण या चित्रपटाच्या टिझर मधून एक फार सुंदर वाक्य ऐकलं ते म्हणजे, 'सर्वच राजकारणी सारखे नसतात,काही आनंद दिघे सुद्धा असतात'. लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेने गणेश उत्सव सुरू केला त्याचं भावनेने मंगेश देसाई यांनी आनंदोत्सव केला. आनंद मूर्तीची स्थापना करण्याचा घाट घातला आणि त्या मूर्तीला अतिशय सुरेख रूप दिलं आणि त्या मूर्ती मध्ये प्राण-प्रतिष्ठा केली ती दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी. मी दिघे साहेब यांच्या बदल खूप वाचलं, ऐकलं. माझ्यासारख्या अभिनेत्याला ९५ चित्रपटानंतर प्रमुख भूमिका साकारण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली याचा मला फार आनंद वाटत आहे. या चित्रपटात ज्या ज्या महारथीनी मला मदत केली त्यांचे मी आभार व्यक्त करतो."

एकनाथ शिंदेंची उपस्थिती
याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. चित्रपटाबद्दल बोलतांना ते म्हणाले की,"आनंद दिघे हे शिवसेनेसाठी एक आधारस्तंभ होते. त्यांचे विचार चित्रपटांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात पसरावे हाच आमचा मुख्य हेतू आहे. मंगेश देसाई यांनी मी घातलेला घाट पूर्ण केला आहे. प्रवीण तरडे हे आता या चित्रपटाला पुढे नेण्याचे काम करीत आहेत. आनंद दिघे हे नेहमीच स्फूर्तिदायक होते. कधीच कोणाला दुखावत नव्हते. आमच्या सर्वांचे मुख्य हेतू हाच आहे की, समस्त तरुण वर्गासमोर त्यांचा आदर्श समोर ठेवणे. सर्व प्रेक्षकांनी हा चित्रपट पहावा ही मी विनंती करतो"


हेही वाचा -संजय दत्त म्हणतो KGF: Chapter 2 ने त्याला त्याच्या क्षमतेची जाणीव करून दिली

ABOUT THE AUTHOR

...view details