मुंबई - स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने मंगळवारी अँथनी आणि जो रुसो दिग्दर्शित ''द ग्रे मॅन'' या हॉलिवूड चित्रपटामधील राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता धनुषचा फर्स्ट लुक शेअर केला. धनुष हा नेटफ्लिक्स चित्रपटाच्या एकत्रित कलाकारांचा एक भाग आहे, ज्यामध्ये रायन गॉसलिंग, ख्रिस इव्हान्स, अॅना डी आर्मास, रेगे-जीन पेज, जेसिका हेनविक, बिली बॉब थॉर्नटन आणि वॅगनर मौरा यांचा समावेश आहे.
नेटफ्लिक्स इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने चित्रपटातील एक स्टिल शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेता धनुष कारच्या वर अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक आक्रमकता आणि रक्त आहे. "द ग्रे मॅन' मधील धनुषचा पहिला लूक आला आहे.," स्ट्रीमर नेटफ्लिक्सने लिहिले आहे.