महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

2022 च्या सर्वाधिक लोकप्रिय भारतीय स्टार्सच्या यादीत धनुष अव्वल स्थानी, आलिया आणि ऐश्वर्याचीही बाजी - आलिया भट्ट

साऊथ सुपरस्टार धनुष भारतीय स्टार्सच्या 2022 च्या सर्वाधिक लोकप्रिय भारतीय स्टार्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. आलिया आणि ऐश्वर्यासह इतर कलाकार कोणत्या ठिकाणी आले ते पहा.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 8, 2022, 4:59 PM IST

मुंबई - साउथचा सुपरस्टार अभिनेता धनुष (Dhanush Most Popular Indian Star) जागतिक स्टार बनला आहे. 2022 च्या टॉप अॅक्टर्समध्ये त्याने पहिले स्थान पटकावले आहे. धनुषच्या पाठोपाठ 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील अभिनेत्री आलिया भट्ट आहे, जिने या वर्षी पॅन इंडिया चित्रपट RRR, गंगूबाई काठियावाडी आणि स्ट्रीमिंग चित्रपट डार्लिंग्समध्ये काम केले आहे. धनुष नुकताच तामिळ चित्रपट 'नाने वरुवेन' तसेच या वर्षातील पाच सर्वोत्कृष्ट चित्रपट 'मारन, तिरुचरितांबलम, नाने वरुवेन आणि वाथीमध्ये दिसला होता.

या वर्षाच्या यादीत समाविष्ट झाल्याबद्दल बोलताना आलिया म्हणाली, ''२०२२ हे माझ्यासाठी आतापर्यंतचे चित्रपटातील सर्वात संस्मरणीय वर्ष ठरले आहे. या वर्षी माझ्या सर्व चित्रपटांवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आणि सन्मानित आहे. आपल्या देशातील सर्वोत्तम चित्रपट निर्माते आणि कलाकारांसोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे. मला आशा आहे की जोपर्यंत मी कॅमेऱ्याला सामोरे जात आहे तोपर्यंत मी प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहू शकेन! प्रेम आणि प्रकाश.''

या यादीमध्ये 2022 दरम्यान IMD (Most Popular Indian Stars 2022) साप्ताहिक रँकिंग चार्टमध्ये सातत्याने अव्वल स्थान मिळवणाऱ्या स्टार्सचा समावेश आहे. या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक ठरलेल्या मणिरत्नमच्या महत्त्वाकांक्षी 'पोनियिन सेल्वन: पार्ट 1' या चित्रपटाद्वारे पाच वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. PS1 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली होती.

आलियाचे आरआरआरमधील सहकलाकार राम चरण तेजा आणि एनटी रामाराव जूनियर अनुक्रमे चौथ्या आणि आठव्या स्थानावर आहेत. 'यशोदा' चित्रपटाची अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पाचव्या, हृतिक रोशन सहाव्या आणि कियारा अडवाणी सातव्या क्रमांकावर आहे. 'पुष्पा द राइज' स्टार अल्लू अर्जुनने 9वे स्थान पटकावले आणि त्यानंतर 'KGF' स्टार यश 10 व्या स्थानावर आहे.

हेही वाचा -दीपिका पदुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार, रोहित शेट्टीची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details