मुंबई : साऊथचा सुपरस्टार धनुष सोमवारी मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी धनुषचे विमानतळावर लूक हे फार जबरस्त होते. विमानतळावर धनुषच्या उपस्थितीने पापाराझींना देखील गोंधळात टाकले कारण धनुषला या लूकमध्ये त्यांना ओळखता आले नाही. त्यानंतर पापाराझीने अभिनेत्याला फोटोसाठी पोझ देण्याची विनंती केली. पापाराझीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धनुष मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसतोय, त्याला जवळजवळ ओळखता येत नाही आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता लांब केस आणि पूर्ण वाढलेली दाढीत दिसत आहे. या व्हिडिओत धनुषने धूसर अॅथलीझर पॅन्टसह पेअर केलेल्या माउव्ह-रंगीत हुडीमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये धनुषला ओळखणे ही कठिण आहे. मात्र त्यांच्या चालण्याच्या अंदाजातून त्याला लगेच ओळखल्या जाऊ शकते.
विमानतळावरील धनुषचा व्हिडिओ व्हायरल :धनुषचा हा विमानतळावरील व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना फार आवडला आहे. तसेच विमानतळावर धनुषने पापाराझीला पोझ दिली आहे. त्यानंतर पापाराझीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर घनुषचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. कारण या व्हिडिओमध्ये धनुष हा एकदमच वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. धनुषचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना फार आवडलेल्या दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. तसेच धनुषचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्यामुळे त्यांची प्रत्येक स्टाईल हे त्याच्या चाहत्यांना फार सुंदर वाटते.