मुंबई - Dhanush begins D51 shoot : राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता धनुष स्टारर 'कॅप्टन मिलर' हा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर चांगलीच कमाई करत आहे. दरम्यान, धनुष त्याच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचं नाव 'डी51' ( तात्पुरते शीर्षक असलेला चित्रपट) आहे. या चित्रपटामध्ये धनुषसोबत रश्मिका मंदान्ना, नागार्जुन अक्किनेनी आणि शेखर कममुला दिसणार आहेत. निर्मात्यांनी कार्थी स्टारर 'सुलतान' आणि थलापथी विजय स्टारर 'वारिसु' नंतर तिसऱ्या तमिळ चित्रपटात रश्मिका मंदान्नाला मुख्य भूमिकेत कास्ट केलं आहे.
धनुष करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन :या चित्रपटात काम करण्यासोबतच, धनुष यावर्षी प्रदर्शित होणार्या इतर दोन चित्रपटांसाठी देखील दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसला आहे. त्याचा पहिला चित्रपट 'निलावुक्कु एन मेल एन्नाडी कोबम' आहे, जो 2024मध्ये रिलीज होऊ शकतो. या चित्रपटामध्ये पाविश, अनिखा सुरेंद्रन, प्रिया प्रकाश वारियर, मॅथ्यू थॉमस, वेंकटेश मेनन, राबिया खातून आणि रम्या रंगनाथन यांनी भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाला संगीत जीव्ही प्रकाश कुमार यांनी दिलं आहे. याशिवाय धनुष तात्पुरते शीर्षक असलेल्या 'डी50' चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकेत दिसेल.