मुंबई - Bigg Boss 17 Update: 'बिग बॉस 17' सध्या जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडण होताना दिसत आहे. अलीकडेच विकी जैननं अंकिता लोखंडेला असं काही सांगितलं, ज्यानंतर त्याला अनेकजण सोशल मीडियावर निशाण्यावर धरत आहे. अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीनं विकीच्या वाईट वागण्यावरून चांगलाचं फटकारले आहे. अंकिता लोखंडेचा पती विकी जैन हे स्टार कपल या शोमध्ये आल्यापासून यांच्या खूप वाद होताना दिसत आहे. अंकितानं विकीला अनेकदा तक्रार केली आहे की, तो तिच्यापेक्षा इतर स्पर्धकांना जास्त वेळ देतो. त्यानंतर त्यानं अंकिताला सांगितलं की, तो तिच्या मागे फिरू शकत नाही. तो गेम खेळण्यासाठी आला आहे.
देवोलिना भट्टाचार्यनं विकी जैनला फटकारले :दरम्यान आता 'साथ निभाना साथिया' फेमदेवोलिना भट्टाचार्जीनं विकी जैनच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तिनं ट्विट केले आहे की, 'पती-पत्नीमधील वाद सुरूच आहे. परंतु दररोज आपल्या पत्नीचा अपमान करणे कधीही मनोरंजक असू शकत नाही. विशेषत: बिग बॉस 17 च्या घरात. त्यानंतर अनेक चाहते देवोलीनाच्या पोस्टच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. या पोस्टवर कमेंट करत एकानं लिहलं, 'कोणतेही नाते खेळापेक्षा वरचे नसते' तर दुसऱ्या एकानं लिहलं. 'कोणत्याही नात्यात आदर खूप महत्त्वाचा असतो'. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. याशिवाय अनेक लोकांनी विकीला या वागण्याबद्दल फटकारले आहेत.