महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Deepika Padukones letter to her sister : दीपिका पदुकोणने बहिण अनिशाला वाढदिवसानिमित्य लिहिले हृदयस्पर्शी पत्र - Anisha padukon

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री दीपिका पदुकोणने धाकटी बहीण अनिशाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक सुंदर नोट लिहिली आहे, जी थेट तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. दीपिकाच्या बहिणीबद्दलचे प्रेम पाहून तिचे चाहते प्रशंसा करत आहेत.

Deepika Padukones letter to her sister
Deepika Padukones letter to her sister

By

Published : Feb 2, 2023, 12:16 PM IST

मुंबई - बॉलिवूडची पद्मावत दीपिका पदुकोण सध्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील दीपिकाच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. चित्रपटात दीपिका फुल अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. पठाणच्या यशात शाहरुख खानच नाही तर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचाही वाटा महत्त्वाचा आहे. दरम्यान, दीपिका पदुकोणने तिच्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर एक सुंदर चिठ्ठी लिहिली आहे. दीपिका पदुकोणचे तिच्या धाकट्या बहिणीवरचे प्रेम पाहून तुमचेही हृदय भावूक होईल, बहिणीसाठी दीपिकाची हृदयस्पर्शी पोस्ट तुम्ही जरुर वाचा.

अनिशा पदुकोण 2 फेब्रुवारीला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आता दीपिकाने तिच्या लहान बहिणीला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. बहीण अनिशाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दीपिका पदुकोणने लिहिले आहे की, 'जर तुमच्या आयुष्यात काहीच नसेल, पण तुमच्याकडे एक लाडकी बहीण जरुर असायला हवी, तर तुम्ही इतके श्रीमंत आहात की तुम्ही स्वतःची कल्पनाही करू शकत नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छा अनिशा पदुकोण.' असे, दीपिकाने खूप छान लिहिले आहे. दीपिकाने बहिणीबद्दल पुढे म्हटलंय की, आपण आपले आहोत, बाकी सर्व स्वप्ने आहेत.

अनिशा पदुकोण बद्दल जाणून घ्या? - अनिशा दीपिकापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. तिचा जन्म 1991 साली झाला. अनिशा व्यवसायाने गोल्फ खेळाडू आहे. ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करते. अनिशाचा आपल्या बहिणीप्रमाणे बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही विचार नाही. अनिशाने तिचे शालेय शिक्षण माउंट कार्मेल कॉलेजमधून केले. अनिशाला गोल्फशिवाय क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि बॅडमिंटनमध्येही रस आहे. दीपिका आणि अनिशा हे बंगळुरूमध्येच वाढले आहेत. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि उज्ज्वला पदुकोण यांच्या दोन्ही मुली आपापल्या कौशल्यात निष्णात आहेत. दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात देशाचा गौरव करत आहेत. अनिशा तिच्या आई-वडिलांसोबत राहते तर दीपिका मुंबईत राहते. दीपिकाला जेव्हा-जेव्हा संधी मिळते तेव्हा ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला जाते. अनिशा आणि दीपिका या दोघीही सोशल मीडियावर सक्रिय असून दोन्ही बहिणींमधील प्रेम आणि उत्कृष्ट बाँडिंग पाहायला मिळत आहे. अनिशा द लव्ह लाईफ फाऊंडेशनची सीईओ देखील आहे आणि तिला प्रवासाचीही खूप आवड आहे. दीपिकाचा पती रणवीर सिंगही आपल्या मेव्हणीबद्दल नेहमी अभिमानास्पद पोस्ट लिहित असतो.

हेही वाचा -Creed 3 New Poster : मायकेल बी जॉर्डनने केले क्रीड 3चे नवे पोस्टर लॉन्च, रिलीजची तारीखही जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details