मुंबई- बॉलिवूडची 'पद्मावत' दीपिका पदुकोण तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्य आणि जीवनशैलीमुळे जास्त चर्चेत असते. दीपिका ग्लोबल स्टार बनण्याच्या शर्यतीत आहे. दीपिका अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. आता दीपिका पदुकोणने जिममधून सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला आहे, जो पाहून सेलिब्रिटी हसत आहेत.
दीपिका पदुकोणने जीममधून शेअर केलेल्या व्हिडिओत ती दिसत नाही. खरंतर जिममध्ये झोळीसारखे निळे कापड जीममध्ये अडकवले आहे. या निळ्या कपड्याच्या झोळीत दीपिका हलका झोका घेत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना दीपिका पदुकोणने लिहिले की, मी जिममध्ये खूप मेहनत घेत होते. त्याच दरम्यान कॅरिना कैफने मला कॅमेऱ्यात कैद केले.
दीपिका पदुकोणचा हा मजेशीर व्हिडिओ पाहून वरुण धवन हसला आणि त्याने या अभिनेत्रीच्या मेहनतीच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे. अभिनेता ईशान खट्टरने दीपिकाच्या मम्मी रिटर्न्स या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.