मुंबई- बॉलिवूड सेलेब्रिटींबद्दल सामान्य माणसांच्या मनात मोठे कुतुहल असते. हे लोक राहतात कसे, जगतात कसे यापासून ते त्यांच्या आवडी निवडीपर्यंत लोक जाणून घ्यायला उत्सुक असतात. अलिकडे भारतात विमानाचा प्रवास पहिल्या तुलनेत स्वस्त झालाय. त्यामुळे लांबच्या शहरात जायचे असेल तर लोक विमान प्रवासाची निवड करतात, यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होते. अशावेळी विमानतळावर कोणी क्रिकेटर, गायक, राजकीय नेता किंवा कोणत्याही क्षेत्रातील सेलेब्रिटीची झलक दिसण्याची शक्यता असते. पण जर तुम्ही प्रवास करत असलेल्या विमानातच सेलेब्रिटी असेल तर तुमची उत्सुकता शिगेला पोहोचू शकते. असाच काहीसा अनुभव इंडिगो विमानाच्या प्रवाशांना आला.
हा व्हिडिओ व्हायरलविमानातील प्रवाशी रिलॅक्स असतानाच केशरी रंगाचा ट्रॅकसूट, टोपी आणि सनग्लासेस घातलेली दीपिका पदुकोण चालत आली आणि थेट वॉशरुमच्या दिशेने गेली. तिच्यासोबत सुरक्षा रक्षक असल्यामुळे ती सेलेब्रिटी आहे याची जाणीव प्रवाशांना झाली, पण ती दीपिका पदुकोण असेल यावर क्षणभर लोकांचा विश्वास बसत नव्हता. उपस्थित प्रवाशापैकी कोणीतरी हा व्हिडिओ बनवला, आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सिक्स सिग्मा फिल्म्सने शेअर केलेल्या या व्हिडिओत दीपिका वॉशरुमकडे जात असताना एक महिला तिला हाय करताना दिसते.