मुंबई- चित्रपट निर्माते रोहित शेट्टीने त्याच्या आगामी 'सर्कस' चित्रपटाच्या गाण्याच्या लाँचच्या वेळी उघड केले की अभिनेत्री दीपिका पदुकोणला आपल्या पोलीस विश्वासाठी खाकी गणवेश देणार आहे. ते दोघे एकत्र काम करणार असल्याची घोषणा रोहितने केली.
रणवीर सिंग आणि दीपिकासोबत 'करंट लगा रे'च्या लॉन्चिंगला आलेल्या रोहितने स्टेजवर ही बातमी दिली. तो म्हणाला: "लोक विचारत असतात की सिंघमचा पुढचा भाग कधी येणार? मी आणि दीपिका पुढच्या वर्षी एकत्र काम करणार आहोत, असे सांगण्याची आज संधी मला घेऊ द्या."