मुंबई :दीपिका पदुकोण तिच्या चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. ती नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. दीपिकाने पठाण या चित्रपटात धमाकेदार काम केले. तिच्या अभिनयाचे कौतुक बॉलिवूडमध्ये झाले. आता दीपिका ही एका आघाडीच्या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या कव्हर पेजवर दिसणार आहे. दीपिकाने इंस्टाग्रामवर जाऊन टाइम मॅगझिनवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. प्रत्येक वेळी ती तिच्या फॅशन स्टेटमेंटने सर्वांना प्रभावित करत असते. तिने फोटोत ब्लेझर आणि पॅन्ट घातला आहे. शिवाय तिने तिचे केस हे मोकळे सोडले आहेत. तसेच या फोटोमध्ये तिने तिच्या पायामध्ये कुठल्याप्रकारे हिल्स घातली नाही. या फोटोमध्ये दीपिका फार देखणी दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय मासिकाच्या कव्हर पेजवर दीापिका:दीापिकाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केल्यावर अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करून तिला अभिनंदन संदेश टाकले. त्यानंतर फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता यांनी लिहिले, अप्रतिम दीपिका तू खूप मेहनती आहेस. अभिनंदन!. वापरकर्त्यांपैकी एकाने लिहिले, 'ग्लोबल स्टार दीपिका' ('Globalstardeepika.') दुसर्याने वापरकर्त्याने लिहले , 'द ग्लोबल क्वीन.' दीपिकाने फोटोशूटमधील पडद्यामागचे काही फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये तिचा उत्साह आपल्याला बघायला मिळत आहे.
ऑस्कर नाटू नाटू या गाण्याची करून दिली ओळख : या वर्षाच्या सुरुवातीला, तिने ऑस्कर 2023 मध्ये प्रस्तुतकर्ता म्हणून हजेरी लावली होती. तिने ऑस्कर स्टेज सोलो स्वीकारला आणि आरआरआरचे गाणे, नाटू नाटू हे थेट सादरीकरणापूर्वी तिने गाण्याची ओळख करून दिली. गाण्याबद्दल बोलताना ती म्हणाली, 'एक अप्रतिम आकर्षक कोरस, विद्युतीय बीट्स आणि किलर डान्स मूव्ह टू मॅच यामुळे हे गाणे जागतिक खळबळजनक बनले आहे. हे RRR, वास्तविक जीवनातील भारतीय क्रांतिकारकांमधील मैत्रीवर आधारित चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण दृश्यादरम्यान वाजणारे गाणे आहे. अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम. तेलुगुमध्ये गायले जाण्याव्यतिरिक्त आणि चित्रपटाच्या वसाहतवादविरोधी थीमचे चित्रण करण्याबरोबरच, हे गाणे संपूर्ण धमाकेदार आहे!' ती पुढे म्हणाली, 'याला Youtube आणि Tik Tok वर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक या गाण्यावर नाचत आहेत आणि ऑस्करसाठी नामांकन मिळालेले हे भारतीय प्रॉडक्शनमधील पहिले गाणे आहे. तुम्हालानाटू नाटू माहित आहे का? आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू हे गाणे आहे.' अलीकडे, तिने ऐतिहासिक ऑस्कर 2023 चे बॅकस्टेज फोटो शेअर केले.
वर्क फ्रंट : दीपिकाच्या जर वर्क फ्रंटवर बोलायला गेले तर , दीपिका आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट प्रोजेक्ट 'के' (k)मध्ये अभिनेता प्रभास सोबत झळकणार आहे.ती सिद्धार्थ आनंदचा पुढील एरियल अॅक्शन थ्रिलर चित्रपट फायटर यामध्ये हृतिक रोशनसोबत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय हे देखील दिसणार आहे. या वर्षीचा सर्वात मोठा हिट 'पठान' दिल्यानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबतचा हा तिचा दुसरा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट पुढल्यावर्षी २५ जानेवारीला रिलीज होणारा आहे.
हेही वाचा :Kangana Ranaut talks : कंगना रणौतने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी केले होते हेही काम