मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचे भूतान भेटीतील फोटो या आठवड्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांनंतर, दीपिकाने तिच्या अलीकडील सुट्टीतील फोटोंच्या स्ट्रिंगसह फॉलोअर्सना नवी ट्रिट दिली. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या छोट्या देशाला दीपिकाने भेट दिली.
निसर्गाच्या कुशीत रमलेली दीपिका- शनिवारी, दीपिकाने तिच्या भूतान सुट्टीतील फोटोंची मालिका इंस्टाग्रामवर शेअर गेली. अभिनेत्री दीपिकाने निसर्गाच्या कुशीत चांगला वेळ घालवला होता. लहान मुलांसोबत पोझ देण्यापासून ते जंगलात फेरफटका मारण्यापर्यंत आणि भूतानच्या सौंदर्यात भिजण्यापर्यंत, दीपिकाचे नवीन फोटो तुम्हाला तुमच्या बॅग पॅक करून सुट्टीसाठी जाण्यास भाग पाडतील. स्वच्छ मोकळी हवा, भरपूर ऑक्सीजन, निर्मळ पाण्याचे झरे, उंच डोंगर कपाऱ्या, नागमोडी वळणाचे सुंदर घाट, आकाशापर्यंत उंच मोहक शिखरे अशी दृष्ये या छोट्या देशात पाहायला मिळतात. भारता शेजारी असलेल्या इतर देशांपैकी हा एक सुंदर देश आहे. मुख्य म्हणजे यासाठी मोठ्या खर्चाचीही गरज नाही. मध्यमवर्गीयही आपल्या बजेटमध्ये इथे सहलीसाठी जाऊ शकतात.