मुंबई - Singham Again: नवरात्रीनिमित्त दीपिका पदुकोणनं तिच्या चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. तिच्या आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटातील व्यक्तिरेखेचा खुलासा आज 15 ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या मुहूर्तावर करण्यात आला आहे. या चित्रपटातील तिच्या पात्राचे नाव 'शक्ती शेट्टी' असेल. दीपिका पदुकोणनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती पोलिसाच्या गणवेश दिसत आहे. या लूकमध्ये ती चांडालिका रुपात आहे. त्याचबरोबर दीपिकाचा हा अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे. 'सिंघम अगेन'मधील तिचा दमदार फर्स्ट लूक पाहून अनेकजण तिचे कौतुक करत आहेत.
दीपिका पदुकोणनं नवरात्रीनिमित्त दिले चाहत्यांना गिफ्ट :दीपिका पदुकोणनं पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'परिचय देत आहे, शक्ती शेट्टी.' पहिल्या पोस्टरमध्ये दीपिका पोलिसांच्या गणवेशात असून तिच्या चेहऱ्यावर काही जखमा दिसत आहे. या पोस्टरमध्ये ती एका गुंडाच्या चेहऱ्यावर बंदुक ठेवत आहे. याशिवाय या फोटोत एक पोलिसांची गाडी आणि ज्वाला देखील भडकताना दिसत आहेत. दुसऱ्या पोस्टरमध्ये ती बंदूक घेऊन पोझ देताना दिसत आहे. दीपिकाचा हा लूक खूप जबरदस्त आहे. 'सिंघम अगेन'मधील दीपिकाचा फर्स्ट लूक आऊट होताच अनेकांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. तिच्या पोस्टवर रणबीर कपूर, आलिया भट्ट यांसारख्या अनेक सेलिब्रिटींच्या कमेंट्स केल्या आहेत. दीपिकाचा पती-अभिनेता रणवीर सिंगनं कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजीसह लिहिलं. 'आग लगा देगी'. त्यानंतर आलिया भट्ट, जान्हवी कपूर आणि नील नितीन मुकेश यांनी कमेंट विभागात फायर इमोजी पोस्ट केले आहेत. दीपिका पदुकोणच्या या अवताराला चाहत्यांनी लेडी सिंघम असं नाव दिलं आहे.