महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Deepika Padukone : दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस फोटोने इंटरनेटवर जाळ, रणवीर सिंगनेही दिली प्रतिक्रिया - Ranveer Singh

दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सना खूश करत ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोवर इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांसह पती रणवीर सिंगनेही प्रतिक्रिया दिली आहे.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण

By

Published : Jul 31, 2023, 6:58 PM IST

मुंबई- बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण गोल्या वर्षी पठाण चित्रपटाच्या बेशरम रंग गाण्यामुळे बरीच चर्चेत आली होती. हे गाणे वादग्रस्त बनले आणि त्याचवेळी यातील दीपिकाच्या ग्लमरचीही हवा निर्माण झाली होती. या गाण्यात ती निर्विवादपणे सुंदर दिसली होती आणि हे गाणे तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरले. पण गल्ली पासून संसदेपर्यंत यावर वादळ निर्माण झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डने यात हस्तक्षेप केला होता. दीपिकाने आता सोशल मीडियावर एक बिकीनीतील फोटो शेअर करत पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तिचा हा ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे.

इंस्टाग्रामवर दीपिकाने एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे. दीपिका या ड्रेसमध्ये रिसॉर्ट वेअर ट्राय करताना दिसत आहे. फोटोत तिच्या ग्लॅम टीममधील एक सहकारीही दिसत आहे. फोटो शेअर करताना दीपिकाने लिहिले की, 'वन्स अप ऑन ए टाईम, नॉट सो लॉन्ग अ‍ॅगो.' या फोटोमध्ये दीपिका पदुकोण ब्लॅक अँड व्हाइट ब्रश स्ट्रोक प्रिंट बिकिनी आणि मॅचिंग सारँग परिधान केलेली दिसत आहे.

दीपिकाने हा फोटो शेअर केल्यानंतर तातडीने तिचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्र तिच्या या लूकवर फिदा झाल्याचे पाहयला मिळाले. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनीही कमेंट सेक्शनमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली. दीपिकाचा पती रणवीर सिंगनेही तिच्या या लूकचे कौतुक केले आहे.

दरम्यान, दीपिका पदुकोण आगामी प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी यांच्यासह कल्की 2898 एडी या सायन्स फिक्शन चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचा टीझर आणि टायटल लॉन्च सोहळा न्यूयॉर्कमध्ये पार पडला. अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत दीपिका फायटर या चित्रपटातही झळकणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा आगामी फायटर चित्रपट एरिअल अ‍ॅक्शनवर भर देणारा असे, असे निर्मात्यांनी या अगोदर सांगितले आहे. या दोन्हीा चित्रपटात दिीपिकाला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details