महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रामोजी फिल्म सिटीमध्ये 'प्रोजेक्ट -के'च्या शूटिंगसाठी दीपिका पदुकोण हैदराबादमध्ये दाखल - नाग अश्विन दिग्दर्शित प्रोजेक्ट के

दीपिका पदुकोण तिच्या आगामी मॅग्नम ऑपस 'प्रोजेक्ट-के' च्या नवीन शेड्यूलसाठी हैदराबादला पोहोचली आहे. महानटी चित्रपट फेम निर्माते नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका प्रभाससोबत दिसणार आहे.

दीपिका पदुकोण हैदराबादमध्ये दाखल
दीपिका पदुकोण हैदराबादमध्ये दाखल

By

Published : Apr 13, 2022, 12:11 PM IST

हैदराबाद - सुपरस्टार अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या असलेल्या नाग अश्विनच्या आगामी चित्रपट 'प्रोजेक्ट - के'च्या शूटिंगसाठी दीपिका हैदरबादला पोहोचली आहे. सोमवारी रात्री दीपिका मुंबई विमानतळावर हैदराबादला निघताना दिसली. यावेळी त्याने हौशी फोटोग्राफर्सना हसून पोजही दिल्या.' प्रोजेक्ट-के' हे चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक आहे. एक मेगा कॅनव्हास असलेला हा चित्रपट संपूर्ण भारतात रिलीज होणार असून चित्रपटाच्या घोषणेपासूनच चर्चेत आहे.

हैदराबादच्या प्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीमध्ये उभारण्यात आलेल्या विशेष सेटवर चित्रपटाचा एक मोठा भाग शूट केला जाईल. ' प्रोजेक्ट-के' हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे, जो आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट आहे. या शेड्यूलमध्ये दीपिका आणि प्रभासची भूमिका असलेले काही महत्त्वपूर्ण सीक्‍वेन्सचे शूटिंग पूर्ण करण्यात येणार आहे.

'प्रोजेक्ट-के' या सायन्स फिक्शन चित्रपटात दीपिका आणि प्रभास पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. यामध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नामवंत तेलुगू निर्मात्या सी. अश्विनी दत्त या मेगा-बजेट प्रोजेक्टची बँकरोल करत आहेत जो 2023 मध्ये पडद्यावर येण्याची अपेक्षा आहे. शूजित सरकारच्या पिकूमध्ये यशस्वी काम केल्यानंतर दीपिकाचा बिग बी सोबतचा हा दुसरा चित्रपट आहे.

हेही वाचा -Ranbir Kapoor Play Therapist : लव रंजनच्या चित्रपटात रणबीर कपूर साकारणार थेरपिस्ट, सोडवणार 'या' मोठ्या समस्या

ABOUT THE AUTHOR

...view details