महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दीपिका स्टारर 'फायटर'चा ट्रेलर रिलीज, पुलवामासह बालाकोटचाही आहे उल्लेख - फायटर चित्रपट

Fighter Trailer Out : दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन अभिनीत 'फायटर' चित्रपटाचा ट्रेलर हा रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूप दमदार आहे.

Fighter Trailer Out
फायटर ट्रेलर आऊट

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 1:34 PM IST

Updated : Jan 15, 2024, 1:51 PM IST

मुंबई - Fighter Trailer Out : दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि हृतिक रोशन स्टारर 'फायटर' चित्रपट सध्या खूप चर्चेत असून या चित्रपटाची वाट अनेकजण पाहात आहेत. आता चाहत्यांची ही प्रतीक्षाही संपली आहे. 'फायटर' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुमच्यात देशभक्तीची भावना उचंबळून येईल. हृतिक रोशननं 'फायटर'चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं, ''मन आकाशाच्या नावावर आहे. जीवन देशाच्या नावावर आहे. जय हिंद.'' हृतिकच्या पोस्टवर चाहते आता कमेंट्स करत आहेत.

'फायटर'चं ट्रेलर रिलीज : या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, ''फायटर' ट्रेलर पाहून अंगावर काटे आले आहे. हा चित्रपट सुपरहिट होणार आहे.'' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, आता मी प्रतीक्षा करू शकत नाही. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित झाला पाहिजे.'' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं आहे. हा चित्रपट जबरदस्त असणार आहे.'' काहीजण या पोस्ट हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. या चित्रपटासाठी चाहते दीपिका आणि हृतिक शुभेच्छा देत आहेत. 'फायटर' चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा चांगलाच फायदा होईल.

'फायटर' चित्रपटाबद्दल : 'फायटर'बद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाची कहाणी वायुसेनेभोवती फिरते. ट्रेलरमध्ये पथकातील सदस्य संकटांचा सामना करत आकाश आणि देशाचे रक्षण करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत. 'फायटर'च्या ट्रेलरमध्ये मैत्री, धैर्य आणि त्यागाचे सौंदर्य दिसून येते. या चित्रपटात हृतिकनं स्क्वाड्रन लीड शमशेर पठानियाची भूमिका साकारली आहे. तर दीपिका पदुकोण स्क्वाड्रन लीडर मीनल राठोडच्या भूमिकेत आहे. या ट्रेलरमध्ये जबरदस्त काही सीन्स आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. 'फायटर' चित्रपटात दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि हृतिक रोशनशिवाय अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोवर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख हे कलाकार आहेत.

हेही वाचा :

  1. बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा सुशांतसिंगचा उल्लेख, विकीनं 'ती' आठवण सांगून अंकिताला विचारले प्रश्न
  2. मालदीवला जाऊन शुटिंग करणं थांबवा, सिनेवर्कर्सचं असोसिएशनचं चित्रपट निर्मात्यांना आवाहन
  3. प्रभासचा नवा लूक आला समोर, स्टारर 'द राजा साब'चं पोस्टर रिलीज
Last Updated : Jan 15, 2024, 1:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details