महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Deepika praised Alia : मेट गालामध्ये पदार्पण केल्याबद्दल दीपिका पदुकोणने केले आलिया भट्टचे कौतुक - आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने अलीकडेच मेट गाला इव्हेंटमधील आलिया भट्टच्या पडद्यामागील व्हिडिओवर कमेंट केली. आलियाच्या व्हिडिओला दीपिकाच्या प्रतिसादाने लक्ष वेधून घेतले कारण आलियाच्या मेट गाला पदार्पणाच्या काही तास आधी दीपिकाने ऑस्करमधील तिचे फोटो शेअर केल्याबद्दल इंटरनेट टीकेला सामोरे जावे लागले होते.

Deepika praised Alia
दीपिका पदुकोणने केले आलिया भट्टचे कौतुक

By

Published : May 6, 2023, 12:51 PM IST

मुंबई- आलिया भट्टने मेट गालामध्ये पदार्पण करुन काही दवस उलटल्यानंतरही अद्याप त्याची चर्चा रंगतेय. तिला प्रोत्साहन देणाऱ्या सेलेब्रिटीमध्ये दस्तुरखुद्द दीपिका पदुकोण आहे. आलिया पोस्टवर दीपिकाने केलेली कमेंट विशेष महत्त्वाची ठरली असून ती खऱ्या अर्थाने तिची चिअर गर्ल बनली आहे.

दीपिकावर झाली होती टीका- आलिया भट्ट जेव्हा मेट गाला २०२३ मध्ये रेड कार्पेटवर उतरणार होती त्याच्या काही तास आधी दीपिकाने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोत ती ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची प्रेझेन्टर म्हणून पडद्या मागे करत असलेली तयारी ते स्टेजवर येऊन नाटू नाटूच्या गायक आणि संगीतकाराला स्टेवर बोलवून त्यांना परफॉर्म करण्याची संधी देईपर्यंतचे फोटो तिने शेअर केले. हा सर्व प्रकार म्हणजे आलिया मेट गालामध्ये पदार्पण करणार असताना आपण ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात होतो हा मोठेपणा ती दाखवत असल्याचा काहींनी आरोप केला होता. इतकेच नाही तर या फोटोवरुन दीपिकाला ट्रोलही करण्यात आले होते.

दीपिकाने केेले आलियाचे कौतुक- मेट गाला पदार्पणाच्या दरम्यान आलिया भट्ट चिंताग्रस्त बनली होती. तिने एक व्हिडिओ शेअर करुन याबद्दल सांगितले. यात ती रेड कार्पेटवर जाण्यासाठी प्रबल गुरुंगचा ड्रेस घालून तयार होती. अंगावर घातलेला १ लाख मोत्यांच्या ड्रेस तिला भारी वाटत होता आणि ग्लोबल प्लॅटफॉर्मवर पाय टाकण्यापूर्वी तिच्या पोटात भितीचा गोळा उठला होता. सर्वजण तिचा चिअर्स करत होते आणि धडधडत्या काळजासह ती रेड कार्पेटवर अवतरली आणि टाळ्यांच्या कडकडाटासह तिने उपस्थितांची मने जिंकली. या व्हिडिओला चाहत्यांसह अनेक सेलेब्रिटींनी लाईक केले आणि उत्स्फुर्त कमेंट्सही केल्या. आलियाच्या या व्हिडिओवर दीपिकाने कमेंट करत लिहिले, 'You did it' आणि त्यावर हार्ट इमोजी पोस्ट केला.

दीपिकाने आलिया भट्टचे कौतुक केल्यामुळे आलियाच्या चाहत्यांनी तिच्या मेट गाला पदार्पणाच्या दरम्यान करुन घेतलेला गैरसमज दूर झाला आहे.

हेही वाचा -'ib 71' Release : विद्युत जामवालची जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्स असलेला 'आयबी 71' रिलीजसाठी सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details