मुंबई - Deepika Padukone Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दीपिका पदुकोणनं 2007 मध्ये सुपरस्टार शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दीपिका पदुकोणला हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 17 वर्षे पूर्ण करेल. तिनं तिच्या 16 वर्षाच्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट दिली आहेत. दीपिका ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. आज ती 5 जानेवारी रोजी आपला 38वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी आपण दीपिका पदुकोणबद्दल काही गोष्टी जाणून घेऊ या.
दीपिका पदुकोणचा : रणवीर सिंगसोबत नवीन वर्ष साजरे करणारी दीपिका सध्या सुट्टीवर आहे. दीपिकानं रणवीर सिंगसोबत संजय लीला भन्साळी यांच्या रोमँटिक चित्रपट 'राम-लीला'मध्ये काम केल्यानंतर, या जोडप्यांनी डेटिंग करणं सुरू केलं. त्यांचा हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2013 रोजी प्रदर्शित झाला होता. यानंतर या जोडप्यानं 14 नोव्हेंबर इटलीतील लेक कोमोमध्ये लग्न केलं. दीपिका पदुकोण ही बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका प्रियांका चोप्रासारखी ग्लोबल स्टार देखील आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, ती अनेकदा आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँडसाठी जाहिरात काम करताना दिसली आहे. ती अनेक प्रोडक्टची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. एका रिपोर्टनुसार दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती 500 कोटी रुपये आहे.