मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, दोन दिवसांपूर्वी कतारला रवाना झाली होती. तिने फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामन्याच्या प्रारंभापूर्वी माजी स्पॅनिश खेळाडू इकर कॅसिलाससह फिफा विश्वचषक 2022 ट्रॉफीचे अनावरण केले. विशेष म्हणजे, फिफाच्या इतिहासात अशी कामगिरी करणारी दीपिका पदुकोण ही पहिली जागतिक अभिनेत्री आहे.
दीपिका पादुकोण ही लुई व्हिटॉनचा जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर आहे. बेशरम रंग या पठाण चित्रपटातील गाण्यामुळे सध्या भारतात ती वादाच्या केंद्रस्थानी आहे. कतारमध्ये पार पडलेल्या फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये शाहरुख खानही पठाण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजर होता.
18 डिसेंबरच्या सकाळी, दीपिका पदुकोणने लुई व्हिटॉनच्या ज्यूल्स रिमेट ट्रॉफी ट्रंक बुकची एक झलक ऑफर केली - एक ब्रँड ज्याने वर्ल्ड कपसाठी ट्रॉफी ट्रंक कस्टम-मेड केली आहे.
प्रतिष्ठित FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना आणि ह्यूगो लॉरिसच्या नेतृत्वाखालील फ्रान्स यांच्यात झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अखेर अर्जेंटिनाने बाजी मारली आणि मेस्सीने विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले.
अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स सामन्याच्या आधी, दीपिका आणि माजी स्पॅनिश खेळाडू इकर कॅसिलास यांनी फिफा वर्ल्ड ट्रॉफीचे अनावरण केले. या कार्यक्रमात पदुकोणने सैल काळ्या पॅंटसह पांढरा शर्ट घातला होता आणि तिने टॅन रंगाचा लेदर ओव्हरकोट आणि स्टेटमेंट बेल्ट घातले होते. तिने स्लीक बनसह तिचा लूक पूर्ण केला. गोल्डन ट्रॉफी धारण करणार्या इकरसोबत ती लुसेल स्टेडियमच्या मैदानात गेली. फिफाच्या इतिहासात अशी कामगिरी करणारी दीपिका पदुकोण ही पहिली जागतिक अभिनेत्री आहे.
हेही वाचा -Fifa World Cup 2022 : फिफा वर्ल्ड कप अर्जेंटिनाने जिंकल्यानंतर बॉलिवडू सेलिब्रिटी काय म्हणाले...वाचा प्रतिक्रिया