मुंबई - फिफा विश्वचषक 2022 ची सांगता 18 डिसेंबरच्या रात्री मध्य पूर्व देश कतारमध्ये झाली. कतारमधील लुसेल स्टेडियमवर फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात जेतेपदासाठीचा अखेरचा सामना झाला. श्वास रोखून धरायला लावणारा हा रंगतदार सामना अखेर पेनल्टी शूटआऊटवर निकाली निघाला. यामध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली आणि फ्रान्सला 4-2 ने पराभवाचा सामना करावा लागला. लुसेल स्टेडियमवर झालेल्या विजेतेपदाच्या सामन्याचा अनेक बॉलिवूड, साऊथ सिनेसृष्टी आणि टीव्ही कलाकारांनी थेट आनंद लुटला. त्याचवेळी दीपिका पदुकोण पती रणवीर सिंगसोबत पाहुणी म्हणून येथे पोहोचली होती. या अभिनेत्रीनेच फिफा विश्वचषक २०२२ च्या ट्रॉफीचे अनावरण केले होते. दीपिका-रणवीर येथे अर्जेंटिनाला सपोर्ट करत होते.
दीपिकाने ट्रॉफीवरून हटवला होता पडदा - दीपिका पदुकोणने येथे पाहुणी म्हणून पोहोचून फिफा वर्ल्ड कप फायनल 2022 च्या ट्रॉफीचे अनावरण केले होते. येथे दीपिका पदुकोण सुंदर आणि स्टायलिश दिसली. दीपिका काळ्या आणि गडद भगव्या रंगाचा ड्रेस परिधान करून येथे पोहोचली, तर रणवीर सिंग आंतरराष्ट्रीय क्लोदिंग ब्रँड गुच्चीच्या स्पोर्ट्स लूकमध्ये दिसला.
दीपिका-रणवीरने रोखला श्वास - फिफा विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाच्या लढतीत ९० मिनिटे उलटूनही कोणताही निर्णय झाला नाही, तेव्हा पाच मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. यामध्येही दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते. त्याचवेळी, यानंतर 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला, ज्यामध्ये खेळाच्या 25व्या मिनिटाला मेस्सीने गोल करून अर्जेंटिनाच्या आशा उंचावल्या, परंतु मैदानात फ्रान्सचा कर्णधार कायलिन एम्बाप्पे अर्जेंटिनासमोर एकटाच भिंतीसारखा उभा राहिला. . अशा स्थितीत एमबाप्पेने 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेच्या खेळाच्या 28व्या मिनिटाला गोल नोंदवून सामना बरोबरीत आणला. स्टेडियममध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. यावेळी पती रणवीर सिंगसोबत स्टेडियममध्ये बसल्याने दीपिका पदुकोणचा श्वास रोखला गेला होता.