महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Deepika and Ranveer Singh : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने स्पोर्ट्स इव्हेन्टमध्ये भाग घेऊन ट्रोलर्सची तोंडे केली बंद - भारतीय खेळाडूंच्या कर्तृत्वाचा गौरव

बॉलिवूडमधील सर्वात प्रिय जोडपे दीपिका आणि रणवीर यांचे एका स्पोर्ट्स इव्हेंटमधील नवीन फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या जोडप्याला कार्यक्रमात वेळ घालवताना आणि दोघांमधील घट्ट नात्याचे दर्शन घडवताना त्यांच्यात काही तरी बिनसलंय या अफवा त्यांनी सपशेल खोडून काढल्या आहेत.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग

By

Published : Mar 27, 2023, 4:19 PM IST

मुंबई- त्यांच्याबाबत असलेल्या सगळ्या अफवांना पूर्णविराम देत, बॉलिवूड कलाकार दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे पॉवर कपल चौथ्या इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स अवॉर्ड्स 2023 मध्ये सुंदर क्षण शेअर करताना दिसले. यापूर्वी, जेव्हा दोघे रेड कार्पेटवर दिसले होते तेव्हा अफवा पसरल्या होत्या की दीपिका आणि रणवीरमध्ये काही तरी बिनसले आहे. गाडीतून उतरल्यानंतर रणवीरने तिला सोबत घेण्यासाठी हात पुढे केला होता. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. खरेतर तिचे लक्ष नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे व्हिडिओत दिसत होते. मात्र त्यांच्या नात्यात बिघाड झाल्याचा तर्क काही युजर्सनी काढायला सुरुवात केली होती आणि अफवांना उधाण आले होते.

या कार्यक्रमात दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, प्रकाश पदुकोण, विराट कोहली यांच्यासह त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि अभिषेक बच्चन उपस्थित होते. इव्हेंटसाठी, दीपिका आणि रणवीरने सर्व-काळ्या मॅचिंग ड्रेसची निवड केली होती. दीपिका पदुकोणने फुल-स्लीव्ह क्लोज-नेक ब्लाउज आणि स्लीक बन असलेली काळी साडी निवडली. तिने हलका मेकअप लुक ठेवला होता आणि अॅक्सेसरीज म्हणून सुशोभित कानातल्यांच्या जोडीने तिचा पोशाख पूर्ण केला होता. दुसरीकडे, रणवीरने पांढऱ्या शर्टवर काळ्या रंगाचा सूट घातला आणि मागे एका लहान पोनीटेलसह त्याचा लूक पूर्ण केला. सेलिब्रेटी जोडपे आणि इतर व्यक्ती एकाच छताखाली एकत्र जमलेल्या भारतीय खेळाडूंच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी एकत्र आले होते. RPSG ग्रुप आणि विराट कोहली फाऊंडेशन दरवर्षी भारतीय क्रीडा व्यक्तिमत्त्वांना भारतीय क्रीडा सन्मान प्रदान करण्यासाठी असा कार्यक्म आयोजित करतात.

वर्क फ्रंटवर दीपिकाने आधीच फायटरच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. यात ती हृतिक रोशनसोबत नवीन जोडी बनवणार आहे. सिद्धार्थ आनंदचा चित्रपट फायटरमध्ये अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोव्हर आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 25 जानेवारी 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, ती अमिताभ बच्चन आणि अभिनेता प्रभास यांच्यासोबत प्रोजेक्ट के मध्ये काम करत आहे. द इंटर्नच्या रिमेकमध्येही ती बिग बींसोबत दिसणार आहे.

हेही वाचा -Malti Maries Bedtime Stories : प्रियंका चोप्राने मुलगी मालती मेरीच्या बेडटाइम स्टोरीजची दाखवली झलक

ABOUT THE AUTHOR

...view details