मुंबई - अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार कुशा कपिलाने जोरावर सिंग अहलुवालियापासून घटस्फोट घेत असल्याची बातमी जाहीर केल्यापासून ती चर्चेत आली आहे. तिच्या घटस्फोटानंतर, कुशाने तिची 'बेस्ट फ्रेंड' दीपिका पदुकोणसोबत पहिली सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.
बुधवारी, कुशाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिची पहिली पोस्ट शेअर केली. कुशाने ये जवानी है दिवानी-प्रेरित व्हिडिओमध्ये दीपिकासोबत सहयोग केला होता. यात दोघींनी चांगल्या मैत्रीणीच्या भूमिका केल्या. व्हिडिओमध्ये, दीपिका कुशासोबतच्या तिच्या मैत्रीचा बचाव करताना दिसत आहे.
व्हिडिओ शेअर करताना कुशाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बेस्ट फ्रेंड ऐसी बनाओ की 4 लॉग बोले ये मेरी भी बेस्ट फ्रेंड है.' तिने पोस्ट शेअर करताच, सर्व दिशांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला. पोस्टवर प्रतिक्रिया देताना, एका युजरने कमेंट केली की, एक क्विन दुसरीसोबत!!!!! या रीलचा प्रभाव कायमचा राहील. या व्हिडिओत कुशा दीपिकाचे भरपूर कौतुक करताना दिसत आहे. खरंतर हा एक जाहिरातीचा भाग असून दीपिकासोबत एक मैत्रीण पाहून कुशा जळते. त्यावर दीपिका तिला अजूनही ती कशी तिचीच बेस्ट फ्रेंड असल्याचे समजावते.
कुशा कपिला आणि जोरावर सिंग अहलुवालिया यांनी काही वर्षे डेटिंग केल्यानंतर २०१७ मध्ये लग्न केले होते. त्यांनी जाहीर केले की त्यांनी २६ जून रोजी त्यांचे लग्न संपवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक आघाडीवर, कुशा प्लॅन ए प्लॅन बी या चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती मसाबा मसाबा 2 मध्ये देखील दिसली होती.